![]()
गुरुपौर्णिमेच्या उत्सवासाठी अक्कलकोट नगरी भक्तिरसात न्हाऊन निघण्यासाठी सज्ज झाली आहे. येथील प्रसिद्ध श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर, समाधी मठ आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सवासाठी दीड लाखांवर भाविकांची मांदियाळी जमणार आहे. गुरूपौर्णिमेच्या पूर्वसंध्येलाच शहरांमधील सर्व भक्तनिवास व यात्रीनिवास फुल्ल झाले असून, प्रशासनाने आणि देवस्थान समितीने गर्दीचे नियोजन करण्यासाठी चोख व्यवस्था केली आहे. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गर्दी लक्षात घेता श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर पहाटे २ वाजताच उघडण्यात येणार आहे. काकड आरती नेहमीप्रमाणे पहाटे ४:०० वाजता होईल. वाढती गर्दी पाहता या दिवशी स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे वैयक्तिक अभिषेक बंद राहतील. सकाळी ११:०० वाजता संपन्न होईल.रात्री ७:५० ते ८:३० या वेळेत होईल. क्रिकेट अकॅडमीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आणि गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सकाळी ७:०० ते ९:०० या काळात महाप्रसाद गृह येथे ‘श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत’ ग्रंथाचे सामूहिक पारायण. सकाळी ९ ते १० नामस्मरण, जप व श्री गुरूपूजा, सकाळी १० वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते श्रींची महाआरती व महानैवेद्य. धार्मिक विधींनंतर दुपारी १२:३० वाजता मंडळाच्या नवीन वाहनतळ जागेत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट संचलित ‘अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमी’चा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे, मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार शेखर निकम, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे उपस्थित राहतील. वाहतूक नियोजन, वैद्यकीय सेवा “भाविकांच्या सोयीसाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा, दर्शन मंडप, बॅरिकेटींग, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रथमोपचार केंद्र, वैद्यकीय सेवा, व्हीलचेअर तसेच कडक पोलिस व वाहतूक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महेश इंगळे, चेअरमन, श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर
Source link
स्वामींचे दर्शन:अक्कलकोटनगरीत गुरुपौर्णिमा उत्सवासाठी आज दीड लाखावर भाविक, पहाटे दोनपासून भक्तांसाठी मंदिर खुले