![]()
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी बारामतीत स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चेचा आता कोणताही संबंध उरलेला नाही, असे सांगत त्यांनी या शक्यता थेट उडवून लावल्या. जानेवारी महिन्यात विमान अपघातात निधन झालेले तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही गट एकत्र आणण्यावर ठाम होते, असा दावा शरद पवार गटाच्या काही नेत्यांनी यापूर्वी केला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांत घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले होते. दिल्लीतील घडामोडीमुळे वाढला होता संभ्रम जंतरमंतरवर आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. त्यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती.
Source link
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चा अर्थहीन- शरद पवार:बारामतीत वक्तव्य, राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम