Headlines

खंडाळ्यात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात:ध्वजारोहण अन् मिरवणुकीने वेधले लक्ष, विविध शाळा, महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालयांत अभिवादन‎



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त खंडाळा परिसरातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळा, महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालये, ग्रामपंचायत कार्यालये, सामाजिक संस्था, नागरिकांनी अभिवादन केले. विविध उपक्रमांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार

.

विद्यासागर कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींनी गाण्याच्या ठेक्यावर लेझीमचे सादरीकरण केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास जि. प. सदस्य संजय पाटील निकम, पंचायत समिती सदस्य हुसेन शेख, अॅड. कैलास पवार, उत्तम पवार, राजाराम बागूल, सुधाकर बागूल, ताराचंद वेळंजकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य संविधान चौकातील निळ्या ध्वजास मानवंदना देण्यात आली. या वेळी रमेश जेजूरकर, काशीनाथ बागूल, शिवराज पैठणकर, सोपान सोनवणे, बाबू खासाब, साजिद खान, अशरफ खान, अक्रम पठाण, सचिन बागूल, पोलिस उपनिरीक्षक नितीन नलावडे, बिट जमादार विशाल पडळकर, पोलिस पाटील नितीन बागूल, रामभाऊ बागूल, साहेबराव बागूल, भीमराव खंडिझोड, संजय बागूल, भीमराव बागूल, महेंद्र बागूल, अमोल बागूल, आकाश बागूल, चांगदेव बागूल, प्रदीप बागूल, भीमराव बागूल, धोंडीराम बागूल, सुभाष बहाळस्कर, मच्छिंद्र थोरात, मुरलीधर झाल्टे, विजय मगर, विजय शिंदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

जय श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने सरबताची व्यवस्था सायंकाळी ५ वाजता क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रथात ठेवलेल्या प्रतिमांची संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी सहभागी झाले. खंडाळा येथील संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात जय श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने सरबताची व्यवस्था करण्यात आली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *