![]()
हवामान विभागाने गुरुवारी (३० जुलै) राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ तर उर्वरित जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. यामुळे बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ऑरेंज अलर्ट: रायगड, जळगाव, पुणे, कोल्हापूर, सातारा घाटक्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, भंडारदरा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व वर्धा. यलो अलर्ट : पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ. जायकवाडी ६७.३१ टक्के, मराठवाड्याला दिलासा नाशिक | मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिकच्या नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यातून १ जूनपासून ते आतापर्यंत तब्बल ३२.३१३ टीएमसी (९१४.९९ अब्ज लिटर) इतके पाणी सोडण्यात आले आहे. परिणामी जुलैअखेरीलाच तब्बल ६७.३१ टक्के इतका पाणीसाठा जायकवाडीत उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता समन्यायी पाणीवाटपाच्या मेंढेगिरी समितीच्या शिफारशीनुसार नाशिक-अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडीला पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. नाशिकमधील प्रमुख २६ प्रकल्पांत एकूण ५९०४० दलघफू पाणी आहे. जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून माजलगावसाठी पाणी सोडणार जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये सातत्यानेवाढ होत आहे. मात्र, माजलगाव धरणात केवळ१६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळेजायकवाडीच्या उजव्या कालव्यातून शुक्रवारीपाणी सोडण्यात येणार आहे. माजलगाव धरणात२५ टक्क्यांपर्यंत साठा होईपर्यंत पाणी सोडण्यातयेणार आहे. जालना, परभणी जिल्ह्यात पाऊसकमी असल्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतून पाणीसोडण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळेयेत्या २ ते ३ दिवसांत डाव्या कालव्यातून पाणीसोडण्यात येणार आहे. मराठवाड्यात या वर्षी पाऊस कमी झालाआहे.त्यामुळे जायकवाडी हाच मोठा आधारछत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, जालना याजिल्ह्यांसाठी आहे. सध्या खरिपासाठी पाऊस कमीअसल्यामुळे सिंचनासाठी पाण्याचा मार्गजायकवाडीमुळे मोकळा झाला आहे. शुक्रवारी पाणी सोडणार बीडमधील अधीक्षकअभियंता पल्लवी काळे यांनी ‘दिव्य मराठी’शीबोलताना सांगितले की, माजलगाव धरणातपाणीसाठा अत्यल्प आहे. सध्या पाण्याची गरजआहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून तयारी केलीजात आहे. उजव्या कालव्यातून साधारण ११००क्युसेक पाणी सोडण्याची तयारी केली जात आहे.डाव्या कालव्यातून १ लाख ४१ हजार हेक्टर सिंचनहोते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीडजिल्ह्यांना त्याचा फायदा होणार आहे. जालना,परभणी जिल्ह्यांतून पाणी सोडण्याची मागणीकरण्यात आली आहे. त्यामुळे हे पाणी सोडल्यासकापूस, सोयाबीन, तूर पिकांना खरिपात संरक्षकपाणी पाळी देणे शक्य होणार आहे. त्यामुळेशेतकऱ्यांना दिलासा मिळेल. संभाजीनगर,जालना, बीड या जिल्ह्यांत आतापर्यंत खरिपाच्या१७ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. सविस्तर वाचा
Source link
नाशिक, परभणी, बीडसह उर्वरित राज्याला ‘यलो अलर्ट’:विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाचा जोर राहणार, संभाजीनगरसह 14 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट