Headlines

इथेनॉल: सरकारने राज्यसभेत प्रथमच स्वीकारले:ई-20 मुळे बीएस-3 वाहनांचे रबर पार्ट्स खराब, पण इंजिन बदलण्याची गरज नाही




केंद्र सरकारने बुधवारी राज्यसभेत प्रथमच सांगितले की, बीएस-३ मानक गाड्यांमध्ये ई-२० पेट्रोल (२०% इथेनॉल मिश्रित) वापरल्यास काही रबर पार्ट््स व गॅस्केट बदलावे लागू शकतात. मात्र सरकारने स्पष्ट केले की, यामुळे इंजिनमध्ये बदल करण्याची गरज पडणार नाही. हे पार्ट््स सर्व्हिसिंगदरम्यान सहज बदलता येतात. २००५ ते २०१६ दरम्यान बनलेल्या गाड्या बीएस-३ मानकांच्या आहेत. ही माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लेखी उत्तरात दिली. त्यांनी सांगितले की, इंडियन ऑइल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स व ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने दुचाकी-चारचाकी वाहनांवर ई-२० इंधनाचा अभ्यास केला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *