![]()
नांदर येथे महिलेला सापाने दंश केल्याची घटना बुधवारी घडली. आशा सेविकेच्या तत्परतेमुळे महिलेवर वेळेत उपचार झाल्याने अनर्थ टळला आहे. हुदाबी जावेद पठाण ( ३३) घरातील काम करत असताना त्यांना साप दिसला. त्यांनी हाताला ओढणी बांधून साप पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सापाने त्यांच्या हाताला दंश केला. दंश झाल्यानंतरही त्यांनी कोणाला काही न सांगता काम सुरू ठेवले. ११ वाजता तपासणीस आलेल्या आशासेविका आशा धरम यांना हुदाबी यांनी ही घटना सांगितली. धरम यांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. वैद्यकीय अधिकारी डॉ. राणी मुगदल यांनी पाचोड ग्रामीण रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
Source link
महिलेला सर्पदंश:वेळेत उपचारांमुळे अनर्थ टळला