![]()
उत्तर-दक्षिण भारताला जोडणाऱ्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर वसलेला कन्नड औट्रम घाट सध्या वाहनचालक आणि प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. तेलवाडी ते चाळीसगावदरम्यानचा ९ किलोमीटरचा रस्ता तीव्र उतार, धोकादायक नागमोडी वळणे आणि सतत कोसळणाऱ्या दरडींमुळे जीवघेणा ठरत आहे. गेल्या दोन महिन्यांत ५ वेळा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या असून दररोज अपघात आणि तासन््तास होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे या घाटातून प्रवास करताना प्रवाशांची गैरसोय होत आहे. सोलापूर ते धुळेदरम्यानच्या ४७० किलोमीटरच्या महामार्गाच्या रुंदीकरणासाठी शासनाने हजारो कोटी रुपये खर्च केले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर ते करोडी ५१३ कोटी, तर बोढरे ते धुळे १००७ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला. मात्र, अवघ्या ९ किलोमीटरच्या अत्यंत आव्हानात्मक औट्रम घाट भुयारी मार्गासाठी पुरेशी आर्थिक तरतूद न झाल्याने २०२१ मध्ये हा महामार्ग भुयारी मार्गाविनाच घाईघाईने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. परिणामी, दररोज मार्गावरून धावणाऱ्या हजारो लहान-मोठ्या वाहनांना आणि हजारो प्रवाशांना जीव मुठीत धरून या धोकादायक घाटाचा सामना करावा लागत दरडी कोसळून होणारी हानी टाळण्यासाठी प्राधिकरणाने प्रत्यक्ष सुरक्षा प्रणाली कार्यान्वित करावी, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष इंजि. मिलिंद लक्ष्मीकांत पाटील, कृषिभूषण डॉ. सीताराम जाधव, नगरसेवक अब्दुल जावेद आणि नगरसेवक प्रकाश अग्रवाल यांच्यासह मान्यवरांनी केली आहे. Ãघाटातील धोकादायक भागात लोखंडी जाळी बसवली जाईल. तसेच वाहतूक कोंडी व अपघातांवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून ५.५ किलोमीटरचा भुयारी मार्ग आणि ३.५ किलोमीटरचा उंच पूल अशा स्वरूपाच्या ३ ते ४ हजार कोटी रुपयांच्या कामाचा प्रस्ताव दिल्लीतील कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. – प्राजक्ता सातपुते, व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण १८६९ मध्ये ब्रिटिश अधिकारी सर जेम्स औट्रम यांनी या घाटाची डागडुजी करून मार्ग सुकर केला, ज्यावरून या घाटाला औट्रम घाट हे नाव पडले. गर्भातील कठीण खडकांमध्ये काही ठिकाणी चुनखडीचे प्रमाण आहे. पावसामुळे चुनखडी विरघळून खडकांची झीज होते, दगड रस्त्यावर कोसळतात, असे अभ्यासक डॉ. संजय पाईकराव यांनी सांगितले. पावसामुळे माती वाहून जाऊन खडक मोकळे होत आहेत. प्रशासनाने ५.५ किमी भुयारी मार्ग आणि ३.५ किलोमीटर पूल अशा स्वरूपाच्या ३ ते ४ हजार कोटी खर्चाच्या कामाचा प्रस्ताव दिल्लीतील वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. या कामाला किमान ५ वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत पर्यायी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. १८६९ मध्ये घाटाचे काम लोखंडी जाळी बसवणार उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी
Source link
2 महिन्यांत 5 वेळा दरड कोसळूनही ‘औट्रम’चा भुयारी मार्ग कागदावरच:9 किमीचा प्रवास वाहनधारकांसाठी ठरतोय जीवघेणा