मुंबई महापालिका अभियंत्याला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. जवळपास दोन वर्षे न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीनंतर मुंबई सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी पर
.
या प्रकरणात मुंबई महापालिकेच्या एच-पूर्व विभागातील सहाय्यक अभियंता (परिरक्षण) अजय पाटील यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे आणि धमकी देणे असे आरोप अनिल परब आणि इतरांवर ठेवण्यात आले होते. या तक्रारीवरून वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान सदा परब यांच्यासह काही कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली होती.
महापालिकेच्या कारवाईनंतर उसळले होते आंदोलन
जून २०२३ मध्ये वांद्रे (पूर्व) येथील ठाकरे गटाचे पक्ष कार्यालय अनधिकृत असल्याचे सांगत बृहन्मुंबई महानगरपालिकेने ते पाडले होते. या कारवाईचा निषेध करण्यासाठी अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी महापालिकेच्या एच-पूर्व विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता.
आंदोलनानंतर परब यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विभागीय अधिकाऱ्यांची भेट घेत कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शाखेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्रे असतानाही कार्यालय पाडण्याचा निर्णय का घेतला, असा जाब अधिकाऱ्यांना विचारण्यात आला होता.
आंदोलनादरम्यान तणाव, त्यानंतर गुन्हा
मोर्चादरम्यान महापालिकेचे काही अधिकारी आणि कर्मचारी समोर आल्यानंतर वातावरण तणावपूर्ण झाले. त्यावेळी सहाय्यक अभियंता अजय पाटील यांच्यावर हल्ला झाल्याचा आणि त्यांना धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
पुरावे अपुरे ठरल्याने न्यायालयाचा दिलासा
सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे न्यायालयासमोर मांडण्यात आले. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने आरोपींविरुद्धचे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याचे नमूद करत अनिल परब, सदा परब आणि इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या निकालामुळे अनिल परब यांच्यावरील महत्त्वाच्या गुन्हेगारी प्रकरणांपैकी एका प्रकरणाचा शेवट झाला असून, ठाकरे गटासाठीही हा न्यायालयीन निर्णय दिलासादायक मानला जात आहे.
हे ही वाचा…
विलास घुले हत्या प्रकरण:मराठा नसल्यामुळे न्याय मिळत नाही का? गुणरत्न सदावर्तेंचा सवाल, सुप्रिया सुळेंवरही साधला निशाणा

बीड जिल्ह्यातील विलास घुले हत्या प्रकरणावरून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकार, पोलिस प्रशासन आणि महाविकास आघाडीतील काही नेत्यांवर जोरदार टीका केली. या प्रकरणातील मुख्य आरोपींवर कारवाई होत नसल्याचा आरोप केला. आम्ही मराठा नाही म्हणून न्याय मिळत नाही का? असा सवाल उपस्थित करत, त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी मृत विलास घुले यांच्या आई आशाबाई घुले याही उपस्थित होत्या. सविस्तर वाचा…
दिल्लीतील दगडांवरील ठसे आधारशी लिंक होतील!:चंद्रकांत पाटलांचा पोलिसांच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या तपासाबाबत दावा; अभिजीत दीपकेंनाही दिला सल्ला

दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर CJP चे संस्थापक अभिजीत दीपके आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आंदोलकांवरील लाठीचार्ज व पॅलेट गन हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली येथे पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला. यावेळी बोलताना त्यांनी दिल्ली पोलिसांच्या ‘ॲडव्हान्स तपासा’बाबतही दावा केला आहे. सविस्तर वाचा…