Headlines

पावसाचा धुमाकूळ:नाशिक घाटमाथ्यावर आज रेड अलर्ट, संभाजीनगरला यलो अलर्ट; जळगाव-विदर्भातही मुसळधारेचा इशारा




राज्यात सलग ८ व्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगरात २४ तासात २७.६, जळगावात ४० मिमी पाऊस झाला. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात तसेच नाशिकमध्ये रिमझिम सुरू होती. मुसळधार पावसामुळे विदर्भ जलमय झाला असून गडचिरोलीत पूरस्थिती निर्माण झाली. नांदेड जिल्ह्यातील उमरी बाजार मंडळात (ता. किनवट) अतिवृष्टी झाली. महाराष्ट्रात जून, जुलै महिन्यामध्ये गेल्या ५ वर्षातील सर्वात कमी पाऊस यावर्षी पडला आहे. सरासरीच्या तुलनेत राज्यात प्रथमच १०० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. २०२२ ते २०२५ या ४ वर्षांत जून, जुलै मिळून राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. यंदा पहिल्या २ महिन्यात सरासरी ५२७.८ मिमीच्या तुलनेत ५०८.७ मिमी पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ९६.४ टक्के आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातही २ महिन्यात गेल्या ५ वर्षात दुसऱ्यांदा सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. विभागात ८१.१ टक्के पाऊस झाला. २०२५मध्ये ९२.२ टक्के पाऊस पडला होता. त्यापूर्वीच्या ३ वर्षांत मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. अनेक भागात मुसळधार पाऊस शक्य- अशोक खुटवड, हवामानशास्त्रज्ञ छत्तीसगड येथील तीव्र हवेच्या दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकून मध्य प्रदेश व विदर्भाच्या दिशेने येण्याची शक्यता आहे. तसेच वातावरणाच्या मधल्या स्तरात पूर्व-पश्चिम ‘शिअर झोन’ दिसून येत आहे. तसेच समुद्रसपाटीवर गुजरातपासून थेट केरळपर्यंत द्रोणिका रेषा तयार झाली आहे. म्हणून राज्यात अनेक भागात २४ ते ४८ तासात मुसळधार पावसाचे संकेत मिळत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *