![]()
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने २८ जुलैपासून सुरू असलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाची गुरुवारी भक्तिमय वातावरणात सांगता झाली. वेदश्री वैभव ओक यांच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी साईभक्तांनी उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घेतला. सांगता दिनी सकाळी ६.५० वाजता संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व त्यांच्या पत्नी वैशाली दराडे यांच्या हस्ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा करण्यात आली. सकाळी ७ वाजता गुरूस्थान मंदिरात मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते रुद्राभिषेक झाला. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या कालयाच्या कीर्तनानंतर श्री साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते यांच्या वंशज ऋतुराज कोते यांच्या हस्ते समाधी मंदिरात दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी संस्थानचे अधिकारी, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त उपस्थित होते. त्यानंतर दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. दुपारी साईभजन, साई की लिला तसेच साईस्वर नृत्योत्सवाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी धुपारतीनंतर गुरुवारची नियमित पालखी मिरवणूक आणि रात्री शेजारतीने उत्सवाची सांगता झाली. उत्सवाच्या सांगता दिनी तामिळनाडूतील चेन्नई येथील साईभक्त आर. वेत्री सेल्वी अव्वल राज यांनी श्री साईबाबांच्या चरणी ३२.०२०० ग्रॅम वजनाची नक्षीकाम केलेली सुवर्णसाखळी अर्पण केली. या सुवर्णसाखळीचे देणगी मूल्य ४ लाख २० हजार ९८३ रुपये आहे. उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थानचे तदर्थ समिती अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजीराव कचरे, समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Source link
साईचरणी 4.21 लाखांची सोनसाखळी:गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता, दहीहंडी फोडून उत्सवाचा भक्तिमय समारो