Headlines

राज्यात पावसाचे थैमान! सलग आठव्या दिवशीही मुसळधार:PHOTO आणि VIDEO च्या माध्यमातून पाहा राज्यातील पूरस्थिती…




राज्यात सलग आठव्या दिवशीही पावसाचा जोर कायम असून विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. या सततच्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून जळगाव, संपूर्ण विदर्भ आणि नांदेडच्या किनवट तालुक्यातही जोरदार पावसाची नोंद झाली आहे. वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हवामान विभागाने नाशिकच्या घाटमाथ्यासाठी ‘रेड अलर्ट’, तर छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील काही भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. दरम्यान, अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचे संपर्क देखील तुटले आहेत. फोटो व व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया राज्यातील परिस्थिती.. चोपडा तालुक्यात मुसळधार पावसाची दमदार हजेरी अनेर धरण मधून मोठा विसर्ग सोलापूर जिल्ह्यातील बोरी नदीला पूर मुंबईत पावसाच्या हलक्या सरी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या व ओढे दुथडी भरून वाहू लागले, ज्यामुळे रस्त्यांचे नुकसान झाले आणि वाहतूक विस्कळीत झाली. वाघालूड-हिवरा पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला. पाटण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीपातळी वाढली असून, पाणी मुळगाव घाट पुलापर्यंत पोहोचले आहे. प्रशासनाने नागरिकांना नद्या, पूल आणि पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
कायधू नदीला पूर रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कायधू नदीला पूर आला असून, हिंगोली-समगा रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे सुमारे १० ते १२ गावांचा हिंगोली शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. पाण्याची पातळी अजूनही जास्त असल्याने, पूरग्रस्त रस्त्यांवरून जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *