Headlines

15 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अहिल्यानगरमध्ये पावसाची हजेरी:चार तास रिमझिम सरी; जिल्ह्यात 60 दिवसांत 213 मिमी पाऊस




गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा असलेल्या अहिल्यानगर शहरासह परिसरात गुरुवारी पावसाने हजेरी लावली. तब्बल चार तास रिमझिम सरी सुरू होत्या. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ०.८ मिमी पावसाची नोंद झाली. जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात २१३ मिमी पाऊस झाला. यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीला पावसाने मोठी ओढ दिली होती. जूनच्या पहिल्या १८ दिवसांत केवळ ३१ मिमी पाऊस झाला होता. जूनअखेरपर्यंतही पावसाचा जोर कमीच राहिला. जुलैमध्ये पावसाने काही भागांत हजेरी लावली; मात्र तो सर्वदूर झालेला नसल्याने खरीप पेरण्यांवर परिणाम झाला. कमी-अधिक पावसाच्या आधारावर जुलैमध्ये जिल्ह्यात सुमारे सहा लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप उर्वरित पान ४ गुरुवारी अहिल्यानगर शहरात चार तास रिमझिम पाऊस झाला. आज मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने शुक्रवार, ३१ जुलै रोजी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यावेळी ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी ७० किलोमीटरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. शनिवारी हलका ते मध्यम, तर रविवारी हलक्या पावसाची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *