Headlines

बँक काय तुमच्या बापाची आहे का?:शेतकऱ्यांना अरेरावी करणे बँक मॅनेजरला महागात, 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्यक्षाने लगावली कानशिलात




कर्जमाफी योजनेची विचारपूस करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांशी उद्धट वर्तन करत “बँक काय तुमच्या बापाची आहे का?” अशी अरेरावीची भाषा करणाऱ्या बँक मॅनेजरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षाने थेट बँकेतच कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत हा खळबळजनक प्रकार घडला असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेमका प्रकार काय घडला? राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ मिळाला की नाही आणि कर्जमाफीच्या यादीत नाव आहे की नाही, याची माहिती घेण्यासाठी शेतकरी बँकेच्या फेऱ्या मारत आहेत. खामगाव येथील सेंट्रल बँकेत कर्जमाफीची माहिती घेण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना बँक व्यवस्थापक (मॅनेजर) शिवाजी कड यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच, “वारंवार तुम्ही बँकेत कशाला येता? बँक काय तुमच्या बापाची आहे का?” अशा शब्दांत शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचे समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी बँकेत धाव घेतली. “शेतकऱ्यांचा बाप कसा काय काढला?” असा जाब विचारत त्यांनी थेट बँक मॅनेजर शिवाजी कड यांच्या कानशिलात लगावली. शेतकऱ्यांना त्रास दिल्यास तीव्र आंदोलन करू; अमोल पाटलांचा इशारा या घटनेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांना उर्मट वागणूक देत आहेत आणि त्यांना 5 लाख रुपये भरायला लावत आहेत. शेतकऱ्यांचा बाप काढण्याचा अधिकार या अधिकाऱ्यांना कोणी दिला? शेतकऱ्यांशी अरेरावी करणाऱ्या व्यवस्थापकाला म्हणूनच आम्ही चोप दिला आहे,” असे पाटील म्हणाले. “यापुढे जर बँकांनी शेतकऱ्यांना असाच त्रास देणे सुरू ठेवले, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर तीव्र आंदोलन करेल,” असा कडक इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. मॅनेजरकडून पोलिसांत तक्रार दाखल भरबँकेत आणि सर्वांसमोर व्यवस्थापकाला मारहाण झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बँक मॅनेजर शिवाजी कड यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या घटनेमुळे कर्जमाफीवरून शेतकरी आणि बँक प्रशासन यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. हेही वाचा… सहकार मंत्र्यांच्याच जिल्ह्यात सावकारांचा सुळसुळाट, पण खात्याला माहितीच नाही!:अवैध सावकारकीसह मायक्रो फायनान्सवरून बच्चू कडूंचा सरकारवर हल्लाबोल “अवैध सावकारकी आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांनी गोरगरीब व शेतकऱ्यांची अक्षरशः लूट चालवली आहे. अनेक जण जामीनदार झाले म्हणून कोट्यवधींच्या जमिनी सावकारांनी बळकावल्या आहेत. हा प्रकार एकाच जिल्ह्यात नव्हे, तर राज्याच्या सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर सुरू असूनही खात्याला किंवा मंत्र्यांना याची साधी माहितीच नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे,” असा जोरदार हल्लाबोल शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. खासगी सावकारी प्रकरणाची पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महसूल व पोलीस प्रशासनाला आणि सहकार मंत्र्यांना थेट इशारा दिला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *