Headlines

मान्सूनचा परतीचा प्रवास; राज्यात 3 दिवसांत हजेरी:देशभरात पावसाचा अंदाज, ईशान्येकडे यलो अलर्ट




नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा देशातून परतीचा प्रवास शनिवारी पश्चिम राजस्थानमधून सुरू झाला. यंदा तो दोन दिवस उशिराने परतत असून, 3-4 दिवसांत पंजाब व गुजरातच्या काही भागांतून माघार घेईल. दुसरीकडे, अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अंदमानमधील हवामान प्रणाली 23 सप्टेंबरपर्यंत तीव्र होऊन ओडिशा-आंध्र किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे दक्षिण भारत व पूर्व किनारपट्टीवर 25 सप्टेंबरपर्यंत पाऊस राहील. ओडिशा आणि आंध्र किनारपट्टीला 21 ते 24 सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’, तर केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, बंगालसह ईशान्येकडील राज्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही रविवारी सर्वत्र वादळी वाऱ्यांसह पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *