Headlines

सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून उकळले पैसे; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल:जामनेरात निवृत्त बँक कॅशियर वर्षभर ‘डिजिटल अरेस्ट’; 23 लाखांना गंडवले




डिजिटल अरेस्ट आणि सीबीआय अटकेची भीती दाखवून भामट्यांनी जामनेर येथील स्टेट बँकेचे निवृत्त कॅशियर माणिक मारुती घुले (७२, रा. शिवशक्तीनगर, जामनेर) यांना २३ लाख ४० हजार ७० रुपयांचा गंडा घातला. भामट्यांनी पोलिसांची खाकी वर्दी परिधान करून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे वर्षभर भीती दाखवून ही रक्कम उकळली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. माणिक घुले हे २०१४ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जामनेर शाखेतून कॅशियर पदावरून निवृत्त झाले आहेत. १० ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांना दीपक शर्मा नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने स्वतःला दिल्ली पोलिस स्टेशनचा अधिकारी असल्याचे सांगितले. ‘तुमच्या आधार कार्डाचा वापर करून सदाकत खान या आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराने सिम कार्ड आणि कॅनरा बँकेत खाते उघडले असून त्यातून तीन कोटी रुपयांची मानवी तस्करी व मनी लाँड्रिंग झाली आहे. त्यामुळे तुम्हाला अटक होईल,’ अशी भीती त्याने घातली. घुले यांनी १३ ऑक्टोबर २०२५ रोजी इंडसइंड बँकेच्या खात्यात ३ लाख ५० हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर पुन्हा १२ लाखांची मागणी करण्यात आली. पैसे नसल्याचे सांगताच ‘जेलमध्ये टाक’ अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे घुले यांनी एसबीआयकडून ७.५० लाखांचे गोल्ड लोन घेतले आणि ओव्हरड्राफ्ट क्लोज करून मिळालेले ३.५० लाख असे मिळून १५ ऑक्टोबर रोजी पुन्हा ११ लाख रुपये पाठवले. खाकी वर्दीतील भामट्यांचा व्हिडिओ कॉल त्यानंतर भामट्यांनी खाकी वर्दी परिधान करून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल केला आणि हे प्रकरण सीबीआय अधिकारी कीर्ती सन्याल यांच्याकडे वर्ग करत असल्याचे सांगितले. काही वेळातच कीर्ती सन्याल नावाच्या महिलेने व्हिडिओ कॉल करून, ‘तुमच्या विरोधात दिल्ली हायकोर्टात केस सुरू असून वॉरंट निघणार आहे, सर्व मालमत्ता सील होईल,’ अशी धमकी दिली. अटकेच्या भीतीने घाबरलेल्या घुले यांनी खात्यात ३.५० लाख रुपये असल्याचे सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *