Headlines

BJP Leader Navnath Ban Targets Abhijeet Deepke Over AAP Punjab Paper Leak


“कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी हवेत आरोप करण्यापेक्षा त्यांना धमकी देणाऱ्या आणि पक्षात येण्याची ऑफर देणाऱ्या एका तरी व्यक्तीचं खुलं नाव जाहीर करावं. ते मूळचे ‘आम आदमी पार्टी’चे कार्यकर्ते असून अरविंद केजरीवाल यांच्या सांगण्या

.

भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासह विरोधकांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला.

अभिजीत दीपके आपचे कार्यकर्ते; पंजाबमध्ये आंदोलन का करत नाहीत?

“महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आव्हान देऊन 24 तास उलटले, तरी अभिजीत दीपके एकही नाव सांगायला तयार नाहीत. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं, हीच त्यांची भूमिका आहे. भाजपने त्यांना कोणतीही ऑफर दिली नाही.”

“अभिजीत दीपके हे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे ‘आका’ अरविंद केजरीवाल आहेत. पंजाबमध्ये फार्मसीचा पेपर फुटला आहे, तिथे जाऊन आंदोलन करण्याची हिंमत दीपके दाखवणार आहेत का?”

संजय राऊत ईस्ट इंडिया नव्हे, तर भ्रष्ट इंडिया कंपनीचे मालक

संजय राऊत यांनी भाजपची तुलना ईस्ट इंडिया कंपनीशी केल्यानंतर नवनाथ बन यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. “संजय राऊत यांनी भाजपवर टीका करण्यापूर्वी आपण ‘भ्रष्ट इंडिया कंपनी’ (I.N.D.I.A अलायन्स) मध्ये आहोत, याचे भान ठेवावे. देशातील जनतेने या भ्रष्ट आघाडीला घरी बसवले आहे.”

“टिळक भक्तीचे नाव घेण्याचा संजय राऊतांना कोणताही अधिकार नाही. ते इटलीचे भक्त आणि सोनिया गांधींचे गुलाम आहेत. पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार दिला जात असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”

राहुल गांधींना अंतराळातील पुरस्कार द्या; इडियट कोण हे देशाला माहीत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर बन यांनी सडकून टीका केली. “संजय राऊत चंद्रकांत दादांच्या वक्तव्याचा विपर्यास करत आहेत. पण ज्या राहुल गांधींनी ‘इधर से आलू डालूंगा, उधर से सोना निकालूंगा’ हे संशोधन केलं होतं, त्यांना संजय राऊत कोणता आंतरराष्ट्रीय किंवा अंतराळातील पुरस्कार देणार आहेत?”

“संसदेत देशातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांना ‘इडियट’ म्हणून हिणवणाऱ्या राहुल गांधींविरोधात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आणलेला हक्कभंग प्रस्ताव योग्यच आहे. देशात इडियट कोण आहे, हे जनतेने २०१४ पासून ओळखले आहे.”

“अँटी पेपर लीक विधेयकावर संसदेत चर्चा सुरू असताना काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या खासदारांनी सभागृहातून पळ काढला. इतिहासात त्यांची नोंद ‘पळपुटे विरोधक’ म्हणूनच होईल.”

वंदे मातरम आणि संविधानाचा अपमान हेच काँग्रेस-उबाठाचे धोरण

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत ‘वंदे मातरम’ला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विशेष चर्चा घडवून आणली होती. पण काँग्रेस आणि उबाठा गटाला वंदे मातरम नको आहे; त्यांना पाकिस्तान, बांगलादेश, औरंगजेब आणि अफजल खान प्रिय आहेत. संविधानाचे पुस्तक फेकून देणारे राहुल गांधी आणि वंदे मातरमचा विरोध करणारे विरोधक हे संविधानाचा अवमान करत आहेत.”

मनोज जरांगेंनी सरकारसोबत चर्चा करावी; फडणवीसांनीच मराठ्यांना न्याय दिला

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर बोलताना ते म्हणाले, “ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आणि कागदपत्रे आहेत, त्यांना तातडीने जात प्रमाणपत्रे दिली जात आहेत; कुठेही पेंडन्सी नाही. माझी मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे की त्यांनी सरकारसोबत चर्चा करावी. राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड चर्चेला तयार आहेत.”

“काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, पण एकानेही मराठा समाजाला न्याय दिला नाही. देवेंद्र फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री आहेत ज्यांनी मराठा समाजाला दोन वेळा आरक्षण दिले आणि सवलती लागू केल्या.”

हेही वाचा…

“पोलिसांवरील दगडफेक भाजपच्याच गुंडांनी केली”:अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप, पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेवरही सवाल उपस्थित

कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनात जखमी झालेल्या दिल्ली पोलिस आणि सुरक्षा दलांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सांगितले की पोलिसांवर देखील दगडफेक झाली. एका पोलिस जवानाच्या मुलीने सांगितले की, ‘माझे वडील जेव्हा घरी यायचे, तेव्हा म्हणायचे की आता हे विद्यार्थ्यांचे आंदोलन राहिलेले नाही, यात चुकीचे लोक सामील झाले आहेत. 20 जुलै रोजी माझ्या वडिलांचे सहकारी त्यांना रात्री 10 वाजता घरी घेऊन आले. त्यांच्या डोक्याला 5 टाके होते. त्यांचा गणवेश रक्ताने माखलेला होता, तरीही सोशल मीडियावर त्यांनाच गुन्हेगार ठरवले गेले.’ कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पोलिसांवरील दगदफेकीवर प्रतिक्रिया दिली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.