Headlines

Satara on Global Tourism Map; Koyna Backwater Fest 2026 Launch



सातारा जिल्ह्याला पर्यटन क्षेत्रात आघाडीवर नेण्याच्या दृष्टीने ‘कोयना बॅकवॉटर महोत्सव 2026’ हा एक मैलाचा दगड ठरणार असून, महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि नैसर्गिक पर्यटनाला नवे बळ मिळणार आहे, असा विश्वास राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त क

.

राज्यातील पर्यटनाला नवे परिमाण देण्यासाठी आणि सातारा जिल्ह्यातील कोयना बॅकवॉटर परिसराचे अद्वितीय नैसर्गिक सौंदर्य जगभर पोहोचवण्यासाठी कोयना तापोळा मुनावळे बॅकवॉटर महोत्सव 2026 भव्य स्वरूपात येत्या डिसेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या नियोजनाबाबत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, उपसचिव संतोष रोकडे, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आणि सहसंचालक संतोष जाधव यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत महोत्सवाचे स्वरूप, नियोजन आणि विविध आकर्षणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महोत्सव महाबळेश्वर – तापोळा – मुनावळे या निसर्गरम्य परिसरात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याचा सरकारचा मानस आहे.

पर्यटनाला मोठी चालना मिळणार

मंत्री देसाई यांनी सांगितले की, कोयना बॅकवॉटर परिसराला जागतिक पर्यटन नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सूचनांनुसार महोत्सवाचे नियोजन अत्यंत भव्य आणि दर्जेदार पद्धतीने करण्यात येईल. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सातारा जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. सुधारित रस्ते आणि सुविधा यामुळे पर्यटकांचा प्रवास अधिक सुलभ व सुखकर होणार आहे.

महोत्सवात पर्यटकांसाठी विविध आकर्षक उपक्रमांची रेलचेल असणार आहे. यामध्ये जलक्रीडा (वॉटर स्पोर्ट्स), हेलिकॉप्टर राईड, बग्गी राईड, ड्रोन शो, हाऊसबोट, फ्लोटिंग मार्केट, टेंट सिटी, खाद्य जत्रा, हेरिटेज वॉक विथ राईड , मॉर्निंग योगा, किल्ले व शस्त्र प्रदर्शन, तसेच बालमेळा यांसारख्या उपक्रमांचा समावेश असेल. संपूर्ण परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघणार असून पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देण्यात येणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी शालेय सुट्ट्यांच्या कालावधीत महोत्सव आयोजित करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना पर्यटन, संस्कृती आणि साहसी उपक्रमांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळेल. तसेच तापोळा परिसरात महोत्सवासाठी योग्य स्थळ निश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मंत्री देसाई यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना दिले आहेत. महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँडिंग करण्यासाठी व्यापक प्रसिद्धी मोहीम राबविण्यावरही भर देण्याच्या सूचना पर्यटन विभागाला दिल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *