Headlines

धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळेल किंवा गोठवले जाईल:पक्षाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, पदाधिकाऱ्यांनीही दिला दम




“राज्यातील सध्याचे राजकीय वारे आपल्या पूर्णपणे बाजूने आहेत. त्यामुळे आता थेट ‘मिशन २०२९’ च्या तयारीला लागा. ज्यांना पक्षाने दिलेली जबाबदारी पेलवत नसेल, त्यांनी अजिबात थांबू नये, थेट पद सोडावे,” असा सज्जड दम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना भरला आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर बोलताना, “धनुष्यबाण आपल्यालाच मिळेल, नाहीतर तो कायमचा गोठवला जाईल,” असा मोठा दावाही त्यांनी केला. दादर येथील शिवसेना भवनात आज राज्यभरातील जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे यांनी आगामी रणनीती, पक्षबांधणी आणि संघटनात्मक बदलांबाबत कठोर भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. चिन्हाच्या निकालावर ठाकरेंचा ठाम दावा एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केले. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रलंबित सुनावणीवर पदाधिकाऱ्यांशी बोलताना ठाकरेंनी प्रचंड आत्मविश्वास व्यक्त केला. “न्यायालयाचा अंतिम निकाल आपल्याच बाजूने लागेल आणि पक्षाचे मूळ चिन्ह आपल्याला परत मिळेल. आणि जर तसे झाले नाही, तर ते चिन्ह गोठवले जाईल, पण ते त्यांच्याकडे राहणार नाही,” असे ठाकरे म्हणाले. पदाधिकाऱ्यांना ‘अल्टिमेटम’ आणि ‘मिशन २०२९’ आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनेत कोणतीही कुचराई खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला. “पक्षवाढीसाठी सध्याचा काळ अत्यंत पोषक आहे. त्यामुळे आतापासूनच २०२९ च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून कामाला लागा. काम होत नसेल तर पदे रिकामी करा, तिथे पक्षासाठी राबणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला. ग्रामपंचायतींवर लक्ष; ‘SIR’ नोंदणीचे कडक आदेश केवळ मोठ्या निवडणुकांवर विसंबून न राहता, तळागाळातील ताकद वाढवण्यासाठी आगामी ग्रामपंचायत निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याची रणनीती उद्धव ठाकरे यांनी आखून दिली. तसेच, येत्या ८ ऑगस्टपर्यंत ‘एसआयआर’ (SIR) नोंदणी मोहीम युद्धपातळीवर राबवण्याचे कडक निर्देश त्यांनी दिले. या प्रक्रियेतून एकाही पात्र नागरिकाचे नाव सुटता कामा नये, याची जबाबदारी थेट जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. ‘नीट’च्या मुद्द्यावरून सरकारवर डागली तोफ याच बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ‘नीट’ परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणावरून केंद्र व राज्य सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला. “पेपरफुटीच्या नैराश्यातून ज्या निष्पाप विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्याला सर्वस्वी हे सरकार जबाबदार आहे. सरकारने या मृत्यूंची आणि न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांवर जो अमानुष लाठीमार केला, त्याची जाहीर माफी मागायलाच हवी,” अशी आक्रमक मागणी त्यांनी केली. हे ही वाचा… उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल:अतिरेक्यांशी बोलता, पण देशाच्या भाग्यविधात्यांना झुरळ म्हणता; ही मुले तुम्हाला माफ करतील का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच त्यांना शिवीगाळ करणाऱ्या आंदोलक तरुणांना माफ केल्याचे एका व्हिडिओद्वारे म्हटले होते. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर अत्यंत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. “अतिरेक्यांशी बोलायला तुम्हाला काही वाटत नाही, पण देशाच्या भाग्यविधात्यांना तुम्ही झुरळ आणि भरकटलेले म्हणता,” अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. याचबरोबर, आमदार आदित्य ठाकरे यांनीही ‘एक्स’ (ट्विटर) वरून दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष कारवाईवरून केंद्र सरकारला घेरले आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *