![]()
सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयने 13 सप्टेंबर रोजी नव्याने एफआयआर दाखल केल्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या नव्या एफआयआरमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांसारख्या बड्या राजकीय नेत्यांच्या नावांचा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या प्रकरणातील तपासाच्या हालचाली आता जलदगतीने सुरू झाल्या असून, सीबीआयने या केसचा तपास आपला ‘हुकमी एक्का’ मानल्या जाणाऱ्या गोल्ड मेडलिस्ट महिला अधिकारी एसपी सीमा पाहुजा यांच्याकडे सोपवला आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले जात असून यावर त्यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो. मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती. राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या 6 वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझे नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे. पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, कुठलेही तथ्य आणि सत्य नसलेले हे सततचे खोटे कॅंपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत. अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या. तसेच परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे. सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. दिशा सालियन प्रकरणाला नवे वळण:तपासाची धुरा सीबीआयच्या गोल्ड मेडलिस्ट सीमा पाहुजा यांच्याकडे, कोण आहेत पाहुजा? सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयने 13 सप्टेंबर रोजी नव्याने एफआयआर दाखल केल्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या नव्या एफआयआरमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांसारख्या बड्या राजकीय नेत्यांच्या नावांचा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या प्रकरणातील तपासाच्या हालचाली आता जलदगतीने सुरू झाल्या असून, संपूर्ण देशाचे लक्ष या हाय प्रोफाईल केसकडे लागले असून आता सीबीआयने या केसचा तपास आपला ‘हुकमी एक्का’ मानल्या जाणाऱ्या गोल्ड मेडलिस्ट महिला अधिकारी एसपी सीमा पाहुजा यांच्याकडे सोपवला आहे. वाचा सविस्तर
Source link
अफवांचा धुरळा उडवणं बंद करा!:राजकीय हेतूने चारित्र्यहननाचा प्रयत्न; दिशा सालियन प्रकरणातील नव्या FIR नंतर आदित्य ठाकरेंचा संताप