![]()
सहकारनगर पोलिसांनी अटक केलेल्या मित्राला सोडवण्यासाठी आलेल्या एका तरुणाने पोलिस ठाण्यातच धुडगूस घालत तोडफोड केली. पोलिसांना शिवीगाळ करत पोलिस ठाणे जाळून टाकण्याची, बॉम्बने उडवण्याची तसेच पोलिसांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विनायक दत्तात्रय भोंडवे (२४, रा. चव्हाणनगर, धनकवडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस कर्मचारी मारुती उत्तमराव नलवाड हे अटकेत असलेल्या शुभम भास्कर लोखंडे याच्या बंदोबस्तासाठी तैनात होते. त्याच वेळी विनायक भोंडवे कोणतीही परवानगी न घेता थेट तपास कक्षात घुसला. त्याने पोलिसांकडे शुभम लोखंडे याला तात्काळ सोडून देण्याची मागणी केली. पोलिसांना जिवे मारण्याची धमकी इतर पोलिस शांत करण्यासाठी आले असता तो अधिक आक्रमक झाला. तपास कक्षाबाहेर ठेवलेली फायबरची खुर्ची लाथ मारून त्याने फोडली. या वेळी आरोपीने उपस्थित पोलिसांना जिवे मारण्याची धमकी दिली. “पोलिस कर्मचाऱ्याची हत्या करीन, कोयत्याने वार करीन किंवा गोळी घालीन,’ अशी धमकीही दिली.
Source link
पोलिस ठाणे बॉम्बने उडवून देईन; मित्रास सोडवण्यासाठी तरुणाने दिली धमकी:पुण्यात पोलिसांना शिवीगाळ करत म्हणाला- पोलिस ठाणे जाळून टाकेन