Headlines

राज्यात लवकरच नवे रुग्णवाहिका धोरण राबवणार- परिवहनमंत्री सरनाईक:मनमानी भाड्याला आता चाप; ॲपवर दिसेल रुग्णवाहिकेचे “लाइव्ह लोकेशन’




वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी रुग्णांना वेळेवर मदत मिळावी आणि खासगी रुग्णवाहिकांच्या मनमानी भाड्याला आळा बसावा, यासाठी महाराष्ट्र सरकार लवकरच सर्वसमावेशक “रुग्णवाहिका धोरण’ आणणार आहे. या अंतर्गत राज्यातील प्रत्येक नोंदणीकृत रुग्णवाहिकेवर “रिअल-टाइम’ डिजिटल देखरेख ठेवली जाईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी दिली. या नव्या धोरणाचा मुख्य उद्देश रुग्णवाहिकांचे बुकिंग, रिस्पॉन्स टाइम आणि दरनिश्चिती यामध्ये सुसूत्रता आणणे हा आहे. राज्यात सध्या “एमईएमसी १०८’ अंतर्गत १,०७६ तर खासगी व धर्मादाय संस्थांमार्फत सुमारे ५,००० रुग्णवाहिका कार्यरत आहेत. मात्र, त्यांच्या ट्रॅकिंगसाठी कोणतीही एकसमान यंत्रणा नव्हती. ती उणीव या धोरणातून भरून काढली जाईल. नागरिकांना बुकिंगपूर्वी प्रवासाचे भाडे दिसेल सध्या रुग्णवाहिकांना टोलमाफी आणि करसवलत मिळते तरीही काही वेळा नागरिकांकडून मनमानी भाडे उकळले जाते. नवीन धोरणानुसार, AIS-125 वर्गीकरणानुसार कमाल दर निश्चित केले जातील. नागरिकांना बुकिंगपूर्वी भाडे दिसेल आणि प्रवासाची इलेक्ट्रॉनिक पावतीही मिळेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *