Headlines

साईभक्तांनी जपली सामाजिक बांधिलकी:विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण, मुंबई, ठाण्यातील साईभक्तांचा कौतुकास्पद उपक्रम




तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गणेशनगर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुंबई व ठाणे येथील साईभक्तांनी शिर्डी पालखी सोहळ्यानिमित्त शाळेला भेट देत विद्यार्थ्यांना सुमारे २ लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य मोफत वाटप केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंडित वाघिरे तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थिनींनी मान्यवरांचे औक्षण करून व लेझीम पथकाच्या गजरात साईभक्तांचे स्वागत केले. वाघिरे म्हणाले, “मुंबई व ठाणे येथील साईभक्त गेल्या नऊ वर्षांपासून या शाळेत पालखी सोहळ्यासह येऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करतात. कार्यक्रमात स्व. भाऊसाहेब वाघ यांच्या स्मरणार्थ शहाणे व वाघ परिवाराच्यावतीने प्रत्येक वर्गातील प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी-विद्यार्थ िनी तसेच आदर्श विद्यार्थी-विद्यार्थ िनींना एकूण १७ हजार ६०० रुपयांची रोख बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी दत्तगुरु पतसंस्थेचे सोपान कासार, कारखान्याचे संचालक अनिल गाढवे, सरपंच सुनीता कासार, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रोहिणी घोगळ, राजेंद्र जाधव, विजय सदाफळ, भारती मोहन, मनीषा खरात, जयंत गिरमे, अशोक कदम आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व आणि साईबाबांच्या श्रद्धा-सबुरीच्या संदेशाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक केले. कोल्हार येथील व्यापारी कैलास पटेल व दिलीप पटेल यांच्यावतीने गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक कैलास चिंधे यांनी केले. सूत्रसंचालन दत्ता गायकवाड यांनी तर आभार वेरोनिका गायकवाड यांनी मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *