Headlines

बँक शाखेचे उद्घाटन:नव्या सहकार कायद्याने शेतकरी, महिला, तरूणांचे सक्षमीकरण, सहकारमंत्री पाटील यांचे प्रतिपादन‎




महाराष्ट्रातील सहकार चळवळीला नवसंजीवनी देण्यासाठी व सर्वसामान्य नागरिक, तरुण व महिलांना मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार लवकरच एक नवीन व सर्वसमावेशक सहकार कायदा आणणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी येथे केली. सहकारमहर्षी डॉ. वामनरावजी कोरपे यांच्या पुण्यदिनानिमित्त अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतनीकृत सिव्हिल लाइन शाखेच्या (एडीसीसी) उद्घाटनाप्रसंगी ते शनिवारी (दि. १) येथे बोलत होते. एडीसीसी बँकेने केवळ ७०० कर्मचाऱ्यांच्या बळावर ४,५०० कोटींच्या ठेवी व सहा हजार कोटींचा वार्षिक टर्नओव्हर गाठला आहे. सहकार क्षेत्रासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. सहकारी बँकांतील नोकरभरतीतील तक्रारी दूर करण्यासाठी सरकारने भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणली आहे. यासाठी तीन नामांकित कंपन्यांची निवड केली आहे. या बँकांना नोकरभरतीची परवानगी देताना स्थानिक तरुणांना न्याय मिळण्यासाठी ७०:३० चा फॉर्म्युला लागू करण्यात आला आहे. त्यानुसार भरतीत ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव आहेत. ३० टक्के जागांवर बाहेरील उमेदवारांना संधी मिळेल, असे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी डॉ. संतोषकुमार कोरपे होते. प्रास्ताविक एडीसीसी बँकेचे अध्यक्ष डॉ. जयराज कोरपे यांनी केले. कार्यक्रमाला रामेश्वर ठाकरे, माजी मंत्री सुभाष ठाकरे, अंगद महाराज सूर्यवंशी, संचालिका उषा हिंगणकर, शोभा झनक, अपर्णा धोत्रे, गीताबाई ठाकरे, कल्पना पाचपोर, विश्वनाथ ताथोड, अरविंद इंगोले, ललित बहाळे, रामेश्वर वाघ, गोपाल काकड, अनिल कुमार जाधव, संदीप खारोडे, डॉ. धीरज देशमुख, डॉ. अभिषेक तिडके, धनंजय गोरे, अजिंक्य राऊत, नितीन जाधव, जावेद पटेल, विभागीय सहनिबंधक (अमरावती) गौतम वर्धन, विभागीय सहनिबंधक (ऑडिट) सुदाम रोडगे, जिल्हा उपनिबंधक (अकोला) गितेशचंद्र साबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य आदी उपस्थित होते. अनेक वर्षांपासून प्रलंबित २५० गटसचिवांना नियमित केडरमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय ऐतिहासिक आहे,’ असे प्रतिपादन एडीसीसी बँकेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक डॉ. संतोषराव कोरपे यांनी केले. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विशेष सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी दिवंगत नेते अजित पवार यांच्या योगदानाचे स्मरण केले. ते म्हणाले की १० ते १५ हजारांच्या मानधनावर काम करणाऱ्या गटसचिवांना पे- स्केल लागू करून सहकारमंत्र्यांनी न्याय दिला असून यामुळे गटसचिवांना सुरुवातीला ३० हजार तर निवृत्तीवेळी ६० हजार होईल. रिसोडचे आमदार अमित झनक म्हणाले की, एडीसीसी बँकेची निवडणूक ऐतिहासिक ठरली आहे. नवनियुक्त अध्यक्ष जयराज कोरपे, उपाध्यक्ष रामभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वात बँकेची नवी इनिंग सुरू झाली आहे. बँकेचे कर्ज वेळेत फेडणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानात वाढ, शेतकऱ्यांसाठी कर्ज पुनर्गठनाची योजना राबवण्याची मागणी त्यांनी सहकारमंत्र्यांकडे केली. “रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीचा पोत बिघडत असून, कर्करोगासारखे आजार वाढत आहेत, असा इशारा देत सहकारमंत्र्यांनी शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन केले. माती व पाण्याचे परीक्षण करून मोजक्याच खतांचा वापर करा. बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनखर्च कमी करण्याचा सल्ला त्यांनी दिला. ५० हजारांच्या प्रोत्साहन अनुदानात वाढ करा घटसचिवांचा केडरमध्ये समावेश ऐतिहासिक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *