![]()
मनपा हद्दवाढ खडकी परिसरात नाल्याशेजारी भिंत बांधल्याने महसूल कॉलनीत पाणी घुसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हा नाला बुजवण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी विकासकावर केला आहे. खडकी परिसरात शेकडो वर्षांपासून ५० ते १०० फुटांचा असलेला नैसर्गिक नाला बुजवून ४ ते ५ फुटांची नाली तयार करण्यात आली. शिवणी-मलकापूरपासून येणारे पावसाचे पाणी नालीच्या आजूबाजूने न्यू महसूल कॉलनीतील लोकांच्या घरात जात आहे. त्यामुळे संकट उभे ठाकले आहे. खडकीत नाली तयार केल्याने दूरवरून येणारे पाणी लोकांच्या घरात जात आहे. याबाबत नागरिकांनी महापालिकेला निवेदनही दिले होते. तसेच येथील नगरसेवकांना सुद्धा माहिती दिली आहे. आयुक्तांनी बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. १०० फुटांच्या नैसर्गिक नाल्याचे ५ फुटांच्या नालीत रूपांतर कोणाच्या आदेशावरून केले, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. याबाबतची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली. या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
Source link
नाल्याशेजारी भिंत बांधली; महसूल कॉलनीमध्ये पाणी:खडकी सर्वे नं. 5 नैसर्गिक नाला पूर्ण बुजवला