![]()
मी स्वत: व्यायाम करत माझे वजन कमी केले असेही आपले सर्वच क्षेत्रातील वजन कमी झाले होते, पण येणारा काळ आपला आहे, त्यामध्ये आपण अतिशय फिट राहायला पाहिजे यासाठी मी आता जीम करतो, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. मागच्या दीड वर्षांमध्ये माझ्या जीवलग सहकाऱ्यांनी सुद्धा मला भेटल्यावर एकच प्रश्न केला भाऊ तब्बेत कशी आहे? हे ऐकूण मी परेशान झालो आणि ठरवले की आता चमत्कार दाखवावा लागेल. सिरसाळा येथील बंजारा समाजाच्या कार्यक्रमात बोलताना मुंडे यांनी माजी मंत्री मनोहर नाईक आणि आमदार इंद्रनील नाईक यांच्या कुटुंबाचे कौतुक केले. वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्यानंतर आता इंद्रनील नाईक यांनाही मंत्रीपद मिळाले, हे अत्यंत नशीबवान घराणे आहे. मात्र, आम्ही दोघे मंत्री झालो तर जमले नाही, एकाला घरी बसावे लागले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शायरीतून व्यक्त केल्या भावना धनंजय मुंडे म्हणाले की, पद आणि प्रतिष्ठा येत-जात राहते, पण समाजासोबतचे नाते कधीच तुटू शकत नाही. मैदान मे हरा हुआ बाद में कभी भी जीत सकता है, लेकिन जो अपनों का साथ निभाता है वो कभी भी हार नही सकता” वो ये समाज है. म्हणून तुमचं माझं नातं हे सांगायची गरज नाही असे त्यांनी म्हटले आहे. परळीतील या कार्यक्रमानंतर मुंडेंचे वक्तव्य सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. परळीची संस्कृती वेगळी धनंजय मुंडे म्हणाले की, महापुरुषांना आपण जातीत वाटून घेतले आहे, मात्र परळीची संस्कृती वेगळी आहे. इथे शिवजयंतीचा अध्यक्ष आम्ही मुस्लिम समाजातील व्यक्तीला बनवतो. थोडक्यात महापुरुषांना आपण जातीत बांधून न घेता त्यांचे विचार आत्मसात करून सामाजिक प्रगतीकडे वाटचाल केली पाहिजे. धनंजय मुंडे यांनी यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेयां स्मृतींना आणि कार्याला उजाळा देत अनेक दाखले दिले. …तरी मी स्वत:ला अर्धा डॉक्टर समजतो धनंजय मुंडे म्हणाले की, नियमित व्यायाम करणाऱ्याला त्याचे न्यूट्रिशन काय असायला पाहिजे याच्यावर बोलले पाहिजे, मी सुद्धा तोच डॉक्टर आहे असा किरणचा गैरसमज झाला असावा म्हणून त्यांनी मला तेवढं बोलावं हा आग्रह केला. मी डॉक्टर नसलो तरी मी स्वत:ला अर्धा डॉक्टर समजतो.
Source link
सर्व क्षेत्रांतील आपलं वजन कमी झालं होतं,पण येणारा काळ आपलाच:धनंजय मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा, म्हणाले- महापुरुषांना जातीत बांधू नका