Headlines

वंचितांच्या हक्कांसाठी झटलेले लोकशाहीर‎:अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा जागर; लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रभक्तीला उजाळा‎



शिवसेना शहर शाखेतर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमास पार पडला. नगराध्यक्ष योगेश पाटील व शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे यांच्या हस्ते अ

.

अण्णाभाऊ साठे विचार मंचचे मुरलीधर ससाणे, शिवसेना जिल्हाउपप्रमुख सुनील हांडगे, लक्ष्मण थोरात, रोहित गायकवाड, सचिन कांबळे आदींसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक व परिवर्तनवादी कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तिनिधी | मनमाड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शहर शाखेच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त इंदिरा गांधी कॉम्प्लेक्स येथील त्यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. ज्येष्ठ शिवसैनिक रमेश हिरण, राजाभाऊ आहेर, शिवसेना शहरप्रमुख माधव शेलार, सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रोहित गायकवाड आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. उपस्थितांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि शाहिरी कार्याला उजाळा दिला. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणी आणि शाहिरीतून शोषित, वंचित व कष्टकरी समाजाच्या वेदना प्रभावीपणे मांडत त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यांच्या साहित्याने समाजातील विषमता, अन्याय आणि शोषणाविरोधात जनजागृती करण्याचे काम केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या विचारांचा आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे नेण्याची गरज असल्याचे उपस्थितांनी सांगितले. त्यांच्या साहित्य व विचारांतून समाजातील वंचित घटकांना न्याय, समता आणि हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा मिळते, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.

प्रतिनिधी | सटाणा सटाणा येथील श्रीशक्ती शैक्षणिक संस्थेच्या डिव्हाईन इंग्लिश मिडियम स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनपर कार्यक्रम उत्साहात झाला. महापुरुषांच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रप्रेम, सामाजिक समता आणि मानवतेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे विश्वस्त जे. डी. दातरे, विद्यालयाचे प्राचार्य सुरेंद्रकुमार हांडे, प्री-प्रायमरी इन्चार्ज योगिता कोठावदे तसेच सीबीएसई इन्चार्ज रोहिणी मोरे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी लोकमान्य टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला दिलेली दिशा, राष्ट्रीय चेतना जागृत करण्यासाठी केलेले कार्य आणि ‘हक्क’ हा त्यांचा प्रेरणादायी संदेश आजच्या पिढीसाठीही तितकाच मार्गदर्शक असल्याचे सांगितले. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य, शाहिरी आणि लोककलेच्या माध्यमातून वंचित, शोषित व कष्टकरी समाजाचा आवाज बुलंद करत सामाजिक समता, बंधुता आणि मानवतेची मूल्ये रुजविल्याचे नमूद करण्यात आले.

प्रतिनिधी | सटाणा येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक जिभाऊ शिर्के होते. यावेळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. इयत्ता पाचवी ‘अ’ची विद्यार्थिनी आराध्या सूर्यवंशी हिने मनोगतातून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य व संघर्षमय जीवनाचा तसेच लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रभक्ती, स्वराज्याची संकल्पना आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *