Headlines

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलसाठी 30 ते 40 लाख टन उसाचा वापर; साखरेचे दर 21 टक्के वाढले, 15 दिवसांत भाव 43 वरून थेट 52 रुपयांवर पोहोचले




पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचा वाढता वापर, उसाचे घटलेले उत्पादन आणि साखरेची निर्यात. यातच शासनाने साखरेचा कोटा कमी केल्याने चहाचा कप, गोड पदार्थ, सणावाराचे फराळ यंदा सर्वसामान्यांच्या खिशाला अधिक महाग पडणार आहेत. गेल्या 15 दिवसांत साखरेचे किरकोळ दर 43 रुपयांपासून थेट 52 रुपयांपर्यंत म्हणजे सुमारे 21 टक्के दर वाढले आहेत. याचा थेट परिणाम प्रत्येक कुटुंबाच्या मासिक घरखर्चावर होऊ लागला आहे. येत्या दिवसांत मोठे सण, उत्सव असल्यामुळे साखरेची मागणी वाढत आहे. तसेच उसाचा इंधनात (इथेनॉल) निर्मितीसाठी वाढता वापर, सणासुदीच्या काळात वाढती मागणी, ऊस उत्पादनात झालेली घट, जास्त साखर साठवून ठेवणे आणि बाजारात कृत्रिम तुटवडा ही दरवाढीची प्रमुख कारणे ठरत आहेत. 1 ऑगस्टपासून साठ्यावर निर्बंध साखरेच्या दर नियंत्रणासाठी शासनाने 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरपर्यंत साठवणुकीवर निर्बंध लावले आहेत. कोणत्याही घाऊक व्यापाऱ्याला 4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा ठेवता येणार नाही. तसेच 30 दिवसांपेक्षा जास्त काळ गोदामात ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. काही प्रमुख शहरांतील साखरेचे दर असे पंधरा दिवसांतील साखरेचे दर
साखरेचा प्रकार पूर्वी आता
जाड साखर ~43 ~52
बारीक साखर ~42 ~50
पिठी साखर ~50 ~60
खडी साखर 70 ~80 उसाचा कोणता भाग इथेनॉलमध्ये जातो? इथेनॉलसाठी थेट उसाचा रस वापरतात. त्याचबरोबर साखर तयार केल्यानंतर उरलेल्या मळीचाही वापर केला जातो. भारतातील साखरेचे उत्पादन
2022-2023 328.15
2023-2024 339.64
2024-2025 262.25
2025-2026 28.1
ऑक्टो. ते सप्टेंबर साखर उत्पादन टनांत इथेनॉलमुळे साखरेची दरवाढ मागच्या वर्षी उसाच्या उत्पादनात घट झाली. त्यातच उसाचा इथेनॉलसाठी वापर झाला. त्यामुळे साखरेचे दर वाढले. साखरेचे दर 37 रूपये असताना इथेनॉल प्रक्रिया परवडते. आज इथेनॉलमुळे साखर कारखाने जिवंत आहेत. -रणजित मुळे, संचालक, साखर कारखाना कोटा कमी, भाव वाढले शासनाने साखरेचा कोटा कमी केला आहे. यामुळे साखरेचे दर 45 वरून 50 रुपयांवर गेले आहेत. शहरात दररोज 3 हजार क्विंटल साखरेची गरज आहे, परंतु साठा कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे रेट वाढत आहेत. – नीलेश सेठी, अध्यक्ष, किराणा व्यापारी संघटना इथेनॉलमधील उसाचा वापर बंद केल्यास भाव उतरतील पेट्रोलमध्ये 20 टक्क्यांपर्यंत इथेनॉल इंधन म्हणून वापरले जात आहे. मका, ज्वारी, उसासारख्या खाद्यपदार्थांचा वापर टाळावा. ही मर्यादा ई-10 पर्यंत ठेवली तर साखरेचा कोटा वाढेल आणि भाव उतरतील. – शंकर ठक्कर, राष्ट्रीय मंत्री, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *