![]()
दिल्लीत बसून महाराष्ट्र चालवायचा ही काँग्रेसची परंपरा होती ती आता उबाठाकडून चालू ठेवण्यात आली आहे. त्यांचे नवे मालक राहुल गांधी यांच्या सांगण्यावर उबाठा गट चालवत आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी जे सांगतील तसे उद्धव ठाकरे बोलतात आणि वागतात हे महाराष्ट्र बघतो आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सक्षमपणे चालवत आहेत, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. राऊतांच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो नसतात. अमित शहा कोणाना कधीही घाबरत नाहीत. नवनाथ बन म्हणाले की, मविआच्या काळात 100 कोटी रुपये वसुलीचे प्रकरण गाजले. उद्योगपतींच्या घराबाहेर बॉम्ब ठेवण्यात आला होता हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आता त्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. यावर उद्धव ठाकरे बोलणार आहात का? असा सवाल बन यांनी केला आहे. पंतप्रधान केवळ सोशल मिडीयावर बोलत नाही तर ते जनतेमध्ये सुद्धा जातात,ते घरात बसून कारभार करत नाहीत. तुमच्यासारखे घरात बसून ते कारभार करत नाही हे राऊतांनी पाहिले पाहिजे. मातोश्रीवर बसून काही आम्ही करत नाही. राहुल गांधींना प्रश्न विचारणार का? नवनाथ बन म्हणाले की, राम मंदिर घोटाळा प्रकरणी FIR दाखल झाले असून त्या प्रकरणी चौकशी सुरू आहे, जे दोषी आहेत त्यांना अटक करण्यात आली असून जे दोषी आहेत त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील. पण उद्धव ठाकरे काँग्रेसच्या सांगण्यावर मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला आले नाही त्यांचे काय? काँग्रेसने प्रभु रामचंद्राचे अस्तित्व नाकारले त्याबद्दल तुम्ही राहुल गांधी यांना प्रश्न विचारणार आहात का? असा सवाल बन यांनी केला आहे. श्री राम आणि रामसेतू अस्तित्वात नाही असे सांगणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारे तुम्ही आहात. जनता तुमचे अस्तित्व संपवेल नवनाथ बन म्हणाले की, समाजवादी पार्टीने रामभक्तांच्या छातीवर गोळ्या झाडल्या आणि राऊत इंडिया आघाडीमध्ये त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. तुम्हर प्रभु रामचंद्राची माफी मागितली पाहिजे. तुम्ही भाजपला विरोध करा पण प्रभु रामचंद्रांना विरोध करू नका. त्यांच्या विरोधात गेलेल्या रावणाचे अस्तित्व संपले तसे तुमचे अस्तित्व संपवल्याशिवाय जनता शांत बसणार नाही. पेपरफुटीचे विधेयक मंजूर नवनाथ बन म्हणाले की, पेपरफुटी संदर्भात लोकसभा आणि राज्यसभेमध्ये कायदा पास झाल्यावर आता राष्ट्रपती यांनीदेखील त्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे यापुढे कोणताही पेपरफुटणार नाही आणि जर फुटला तर त्या आरोपींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. पेपरफुटीचे विधेयक मंजूर होत असताना संसदेमधून इंडिया आघाडीच्या लोकांनी पळ काढला होता हे विद्यार्थ्यांनी विसरू नये.
Source link
दिल्लीत बसून महाराष्ट्र चालवणे ही काँग्रेसची परंपरा:उबाठा आता राहुल गांधींच्या तालावर नाचतोय, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात