![]()
राज्यात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले असून आतापर्यंत झालेल्या कामामध्ये मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्याने 89.97 टक्के काम पूर्ण करून अव्वल क्रमांक मिळविला आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सर्वात कमी 73.99 टक्के काम झाले आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमधून विशेष मतदार यादी पुनरीक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ता. 8 ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण करणे अपेक्षीत असून त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याने नियोजन करून बीएलओ यांच्या माध्यमातून कामे केली जात आहेत. या कामांचा दररोज प्रत्येक जिल्ह्यातून आढावा घेऊन माहिती नोंदवली जात आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देखील या कामांचा आढावा घेतला जात आहे. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली त्या त्या विधानसभा मतदार संघात मतदारांना अर्ज वाटप करण्यात आले असून आता हे अर्ज भरून घेत संगणीकरण केले जात आहे. या कामासाठी मराठवाड्यात सुमारे 17 बीएलओ नियुक्त करण्यात आले आहे. मराठवाड्यात ता. 1 ऑगस्ट पर्यंत हिंगोली जिल्ह्याने सर्वात जास्त 87.97 टक्के काम पूर्ण झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 73.99 टक्के, नांदेड 83.33 टक्के, परभणी 86.78 टक्के, जालना 81.16 टक्के, बीड 85.64 टक्के, लातुर 82.09 टक्के तर धााराशिव जिल्ह्यात 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा निवडणुक अधिकारी प्रगती चोंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामाने गती घेत राज्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे. जिल्हाधिकारी गुप्ता यांनी यांनी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून उर्वरित कामही अचूकता, गुणवत्तेला प्राधान्य देत निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे आवाहन केले
Source link
मराठवाड्यात विशेष मतदार यादी पुनरीक्षणात हिंगोली जिल्हा अव्वल:89.97 टक्के काम पूर्ण, छत्रपती संभाजीनगरचे सर्वात कमी 73.99 टक्के