Headlines

संजय राऊतांविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल:जयकुमार गोरेंवरील वक्तव्य भोवले, अवमानकारक भाषेचा वापर केल्याचा आरोप




ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३५६(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. भाजपच्या तक्रारीनुसार, जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी अवमानकारक आणि अशोभनीय भाषेचा वापर केला. या वक्तव्यामुळे मंत्री गोरेंची बदनामी झाल्याचा आरोप करत मनीष केत यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. वादाची ठिणगी नेमकी कशी पडली? या संपूर्ण राजकीय राड्याची सुरुवात जयकुमार गोरे यांनी देहू येथे केलेल्या एका खोचक वक्तव्यावरून झाली. देहूमध्ये भाजपचे नूतन कार्यालय आणि रुग्णवाहिकेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना गोरे यांनी ठाकरे गटावर बोचरी टीका केली होती. “विरोधी पक्षाला सध्या काहीही काम उरलेले नाही. संसदेत चर्चा करून सरकारवर अंकुश ठेवण्याऐवजी ते बाहेरच आंदोलने करत बसतात. आजघडीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे स्वतःचे असे कोणतेही अस्तित्व राहिलेले नाही. ते केवळ आपले अस्तित्व शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. आता त्यांची अवस्था अशी झाली आहे की, कदाचित आगामी निवडणुका ते (सीजेपीचे संस्थापक) अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालीच लढतील,” असा टोला जयकुमार गोरे यांनी लगावला होता. राऊतांचे प्रत्युत्तर, वाद अधिक चिघळला जयकुमार गोरेंच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी वापरलेल्या भाषेवर भाजपने आक्षेप घेतला आणि त्यानंतर या प्रकरणाने कायदेशीर व राजकीय स्वरूप धारण केले. दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यातील सत्ताधारी महायुती आणि ठाकरे गटातील शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. मोहोळमध्ये पुतळ्याला चपलांचा हार अन् दहन संजय राऊत यांनी जयकुमार गोरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद सोलापूर जिल्ह्यात उमटत आहेत. मोहोळ तालुक्यातील अनगर या गावात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून संजय राऊतांविरोधात जोरदार निदर्शने केली. राजन पाटील यांचे सुपुत्र अजिंक्यराणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी राऊतांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घातला आणि त्यानंतर पुतळ्याचे दहन करत आपल्या भावना व्यक्त केल्या. हे ही वाचा… आषाढी वारीतील ‘विठ्ठलसेवे’तून एसटीची तिजोरी भरली:यावर्षी मिळाले 41.18 कोटींचे उत्पन्न, गतवर्षीपेक्षा 5.30 कोटींची वाढ महाराष्ट्राची लोकधारा आणि भक्तीपरंपरेचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या पंढरपूरच्या आषाढी वारीत यंदाही राज्य परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ वारकऱ्यांची हक्काची सोबती ठरली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठल दर्शनाची आस घेऊन निघालेल्या तब्बल ९ लाखांहून अधिक भाविकांना एसटीने सुखरूप पंढरीला पोहोचवले. विशेष म्हणजे, यात्रेनिमित्त केलेल्या या विशेष वाहतुकीतून एसटीच्या उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ५ कोटी ३० लाख रुपयांची भरघोस वाढ झाली आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *