Headlines

अंजनगाव बारी ग्रामपंचायतीचा ठराव:स्वतंत्र पोलिस स्टेशन स्थापनेची मागणी, आमसभेत एकमुखी पाठिंबा




अंजनगाव बारी येथे स्वतंत्र पोलिस स्टेशन स्थापन करण्याच्या मागणीला ग्रामसभेने एकमुखी पाठिंबा दिला आहे. यासंदर्भातील ठराव सर्वानुमते मंजूर करून तो शासन आणि वरिष्ठ पोलिस प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार, अंजनगाव बारी हे बडनेरा विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठे गाव आहे. म्हसला, वळद, गोविंदपूर, पार्डी आणि उदखेड या गावांचा समावेश करून येथे स्वतंत्र पोलिस स्टेशन स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या नागरिकांना पोलिस ठाण्याशी संबंधित कामांसाठी दूरच्या पोलिस ठाण्यांवर अवलंबून राहावे लागते. यामुळे वेळ आणि आर्थिक खर्च वाढतो. नागरिकांना तातडीने आणि प्रभावी पोलिस सेवा मिळावी, कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम व्हावी, तसेच वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने अंजनगाव बारी येथे स्वतंत्र पोलिस स्टेशनची आवश्यकता असल्याचे ग्रामसभेने ठरावात नमूद केले आहे. या मागणीवर लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. भाजपच्या बडनेरा ग्रामीण महिला मोर्चाच्या अध्यक्षा दिपाली मलवार यांनी या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *