Headlines

लाडकी बहीण केवळ घोषणांपुरती राहू नये, अन्यथा गाठ आमच्याशी:खाजगी बसमधील विनयभंगाच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक




गोव्याहून मुंबईकडे येणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या एका महिला प्रवाशाला बसच्या स्टाफकडूनच अत्यंत निंदनीय वागणूक दिल्याची आणि त्रास दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी एक संतप्त पोस्ट करत राज्य सरकार आणि पोलिसांना थेट इशारा दिला आहे. नेमका प्रकार काय घडला? अंबादास दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी ट्रॅव्हल्स कॉर्पोरेशनची एक बस (क्रमांक: MH-43-CK-2981) गोव्याहून मुंबईच्या दिशेने येत होती. या बसमधून छत्रपती संभाजीनगर येथील एक महिला प्रवास करत होती. प्रवासादरम्यान, पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास बसमधील कर्मचाऱ्यांनीच या महिलेला तब्बल तीन वेळा त्रास दिला. महिला प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर असते, त्यांनीच असा गैरप्रकार केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. बस थेट कोलाड पोलिस ठाण्यात या मुजोर आणि महिलांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या स्टाफला धडा शिकवण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत. प्रवाशांच्या आणि स्थानिक यंत्रणांच्या मदतीने ही बस थेट रायगड जिल्ह्यातील कोलाड पोलीस ठाण्यात वळवण्यात आली. सध्या पोलिस याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेवरून सरकारवर निशाणा या घटनेच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “‘लाडकी बहीण’ म्हणणे केवळ घोषणांपुरते मर्यादित राहू नये, या महिलेच्या पाठीशी सरकार आणि पोलिस ठामपणे उभे आहेत, हे कृतीतून दाखवून द्यावे.” ‘अन्यथा गाठ आमच्याशी आहे’ महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर राज्य सरकारने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी करत दानवे यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. “या प्रकरणात महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. अन्यथा गाठ आमच्याशी आहे!” असा इशारा राज्य सरकार आणि पोलिसांना भरला आहे. हेही वाचा.. राज्यात पावसाची तुफान फटकेबाजी: विदर्भातील 45 तालुक्यांत अतिवृष्टी, पुरात 5 जण वाहून गेले; मुंबईसह कोकणला येलो अलर्ट गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाने राज्यातील अनेक ठिकाणी रौद्र रूप धारण केले आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली असून, अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, विदर्भात पावसाने हाहाकार उडवला असून पुरात वाहून गेल्याने पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *