Headlines

फ्रान्समधील कंपनीच्या नावाने 48 लाखांची फसवणूक:पुण्यातील व्यावसायिकाला 'लिक्विड' पुरवठ्याचे आमिष दाखवले




पुण्यातील एका व्यावसायिकाची फ्रान्समधील कंपनीचा प्रतिनिधी असल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी ४७ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. औद्योगिक रासायनिक द्रवपदार्थ पुरवठ्याच्या व्यवहारात ही फसवणूक झाल्याचे उघड झाले असून, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, मे महिन्यात सायबर चोरट्यांनी परदेशी क्रमांकावरून त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. चोरट्याने स्वतःला फ्रान्समधील एका कंपनीचा व्यवस्थापक असल्याचे सांगितले. भारतात ‘न्यूप्रगा एक्स सोल्यूशन’ या औद्योगिक रासायनिक द्रवपदार्थाला मोठी मागणी असून, भारतातील वितरकाचे निधन झाल्याने नवीन वितरकाची नेमणूक करायची असल्याचे आमिष दाखवले. चोरट्यांनी या व्यवसायात मोठ्या नफ्याचे आश्वासन दिले. रासायनिक द्रवपदार्थ खरेदीसाठी पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार, व्यावसायिकाने चोरट्यांच्या बँक खात्यात ४७ लाख ८२ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी आणखी पैशांची मागणी केली. यामुळे व्यावसायिकाला संशय आला आणि आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सराफी दुकानाचे ग्रील तोडून चोरीचा प्रयत्न वडगाव बुद्रुक येथील सोनाई ज्वेलर्सचे कुलूपबंद ग्रील तोडून दुकानात घरफोडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुकानात प्रवेश करण्यापूर्वीच हा प्रकार उघडकीस आल्याने दागिन्यांची चोरी टळली. याप्रकरणी सनी कैलास रामजैस्वार (वय २०, रा. जीटीबी नगर, सायन कोळीवाडा, मुंबई) आणि एका विधिसंघर्षित बालकावर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोनाली विशाल नाशिककर (वय ४३, रा. विठ्ठल हेरिटेज, दत्तनगर, आंबेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. दि. २ ऑगस्ट रोजी पहाटे सव्वातीन वाजता रेणुकानगरीतील शंकर स्मृती बिल्डिंगमध्ये हा प्रकार घडला. आरोपींनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या दुकानाचे लोखंडी ग्रील तोडले. दुकानात प्रवेश करून दागिने चोरण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, चोरी पूर्ण होण्यापूर्वीच हा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलिस निरीक्षक समीर कदम तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *