Headlines

FSSAI Bans Popular Liquor Brands Over Artificial Ingredients | Old Monk | Royal Challege


मद्यप्रेमींसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशातील ‘अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने’ कडक पावले उचलत बाजारातील काही अत्यंत लोकप्रिय दारूच्या ब्रँड्सवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत ओल्ड मॉन्क, रॉयल चॅलेंज, अँटि

.

FSSAI ने केलेल्या सखोल तपासणीत अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या आहेत. यामध्ये दारू तयार करताना जी योग्य नैसर्गिक परिपक्वता प्रक्रिया आणि नैसर्गिक घटकांचा वापर होणे अपेक्षित असते, तो या ब्रँड्सच्या काही उत्पादनांमध्ये करण्यात आलेला नाही. त्याऐवजी, मद्याला विशिष्ट चव आणि सुगंध आणण्यासाठी बाहेरील कृत्रिम (Artificial) फ्लेवर्सची भेसळ करण्यात आल्याचे प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये सिद्ध झाले आहे.

भारताच्या अन्न सुरक्षा नियमांनुसार, मद्यामध्ये नैसर्गिक स्वादवर्धक वापरण्यास परवानगी असली तरी, व्हिस्कीमध्ये व्हिस्कीसारखाच किंवा रममध्ये रमसारखाच कृत्रिम स्वाद वरून मिसळणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

कोणत्या राज्यांत आणि कोणत्या ब्रँड्सवर कारवाई?

ही कारवाई प्रामुख्याने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये उत्पादित झालेल्या विशिष्ट बॅचेसवर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ‘मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर’ कंपनीकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या मद्यप्रेमींमध्ये लोकप्रिय ‘ओल्ड मॉन्क’ रमच्या तीन विशिष्ट प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे.

मध्य प्रदेशात डियाजिओ इंडियाच्या ‘युनायटेड स्पिरिट्स’ने उत्पादित केलेली अँटिक्विटी ब्लू व्हिस्की आणि रॉयल चॅलेंज व्हिस्की, तसेच ‘इनब्रू बेवरेजेस’ची बॅगपायपर डिलक्स व्हिस्की आणि ओल्ड कास्क डिलक्स XXX रम यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

मद्य बाजारात मोठी खळबळ

भारत ही जगातील सर्वात मोठ्या मद्य बाजारपेठांपैकी एक असून, येथील मद्य उद्योगाची उलाढाल वार्षिक ४० अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. विशेषतः ‘डियाजिओ इंडिया’ (युनायटेड स्पिरिट्स) ही देशातील सर्वात मोठी मद्य कंपनी मानली जाते. ज्या ब्रँड्सवर सध्या एफएसएसएआयचा (FSSAI) बडगा उगारण्यात आला आहे, ती सर्व मद्ये देशांतर्गत उत्पादित आहेत. परदेशी स्कॉच किंवा प्रीमियम दारूच्या तुलनेत ही दारू स्वस्त असल्याने, भारतात तिची सर्वाधिक विक्री आणि खप होतो.

उद्योगाचा आक्षेप, कायदेशीर लढाईची तयारी

डायजिओ इंडियाची उपकंपनी युनायटेड स्पिरिट्सने संबंधित उत्पादनांचे लेबल विद्यमान नियमांनुसार असल्याचा दावा केला आहे. हा संपूर्ण उद्योगाशी संबंधित मुद्दा असल्याचे सांगत कंपनीने एफएसएसएआयसमोर भूमिका मांडण्यासह न्यायालयीन मार्गाचाही अवलंब केला असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या देशभरात FSSAI कडून अन्न आणि पेयांच्या गुणवत्तेची अत्यंत कठोर तपासणी मोहीम सुरू आहे, त्याच मोहिमेचा एक भाग म्हणून मद्य क्षेत्रातील या बड्या कंपन्यांवर ही धडक कारवाई करण्यात आली आहे.

हे ही वाचा…

एफडीए कर्मचाऱ्यांची मंत्री झिरवाळांकडे तक्रार:तुकाराम मुंढेंनी केला खुलासा, परवाना निलंबनाच्या कारवाईवरही दिले स्पष्टीकरण

अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागातील धडक कारवायांमुळे चर्चेत असलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रथमच विभागातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवर सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेतील काही कर्मचाऱ्यांनी कामाचे तास, सुट्ट्या आणि कार्यालयीन वेळेबाबत मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र, प्रयोगशाळेचे काम आणि सामान्य कार्यालयीन कामकाज यात मूलभूत फरक असून, लॅब २४ तास कार्यरत ठेवण्यासाठी शिफ्ट पद्धती अपरिहार्य असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.