Headlines

Dindori Farmer Land Dispute Controversy; Bank Officials Police Clash Video


नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील निळवंडी रोडवरील जाधव वस्ती येथे एका शेतकरी कुटुंबावर ओढवलेल्या भीषण प्रसंगाने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. बँकेचे संपूर्ण कर्ज ‘वन टाईम सेटलमेंट’ (OTS) योजनेअंतर्गत पूर्ण भरलेले असतानाही, बँकेच्या अधिकाऱ्यांन

.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, दिंडोरी येथील जाधव वस्तीवरील शेतकरी कुटुंबावर बँकेचे ७ लाख ६७ हजार रुपये कर्ज होते. हे कर्ज त्यांनी ‘वन टाईम सेटलमेंट’ (OTS) योजनेनुसार पूर्णपणे चुकते केले होते. कर्जमुक्त झाले असतानाही बँकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी मुंबईतील मुख्य कार्यालयाला (Central Office) चुकीची व दिशाभूल करणारी माहिती पुरवली.

यानंतर स्थानिक एजंटशी हातमिळवणी करून, बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतकऱ्याची कोट्यवधी रुपयांची जमीन अवघ्या ७३ लाख रुपयांमध्ये परस्पर विकल्याचा आरोप पीडित शेतकरी कुटुंबाने केला आहे.

ताबा घेताना पोलिसांशी झटापट; तरुणाला मारहाण

बँकेचे कर्मचारी जेव्हा पोलिस बंदोबस्तात या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले, तेव्हा अन्यायग्रस्त शेतकरी कुटुंबाने त्यास तीव्र विरोध दर्शवला. या दरम्यान पोलिस अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी झटापट झाली. पोलिसांनी अरेरावी करत दडपशाहीचा प्रयत्न केला आणि या संपूर्ण प्रकारचे मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्या एका स्थानिक तरुणाला मारहाण केल्याचा गंभीर आरोप शेतकरी कुटुंबाने केला आहे. या घटनेचे चित्रीकरण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

पोलिस प्रशासनाचे कारवाईबाबत स्पष्टीकरण

दुसऱ्या बाजूला, पोलिस प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. “न्यायालयाच्या कायदेशीर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि घटनास्थळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस पथक बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत गेले होते,” असे स्पष्टीकरण पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले आक्रमक; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया (X) हँडलवर शेअर करत पोलिस आणि बँक प्रशासनाच्या या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. “कर्ज पूर्ण भरलेले असताना शेतकऱ्याची जमीन हडप करणाऱ्या भ्रष्ट बँक अधिकाऱ्यांची आणि हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी,” अशी जोरदार मागणी पटोले यांनी केली आहे.

हे ही वाचा…

‘मातोश्री’वरील बैठकीत नेत्यांमध्ये खडाजंगी:एक तरुण थेट मोदींना भिडतोय अन् तुम्ही पदांसाठी भांडताय?; उद्धव ठाकरेंनी झापले

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच ‘मातोश्री’ निवासस्थानी ठाण्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि नवीन नियुक्त्यांबाबत चर्चा करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीत ठाणे आणि कल्याणमधील दोन गटांतील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आला. स्वतःच्या डोळ्यांसमोर पदाधिकाऱ्यांची ही गटबाजी आणि राडा पाहून उद्धव ठाकरे अत्यंत संतापले आणि त्यांनी सर्वांची चांगलीच कानउघाडणी केली. “एक तरुण थेट मोदींना भिडतोय अन् तुम्ही पदांसाठी भांडताय? अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना झापले. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.