Headlines

राज्यात पावसाचा जोर ओसरला:घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट, मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा




गेले काही दिवस राज्याला झोडपून काढणाऱ्या मान्सूनने आता बहुतांश भागांत ब्रेक घेतल्याचे चित्र आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरला असून काही ठिकाणी उघडीप मिळाली आहे. मात्र, असे असले तरी आज 4 ऑगस्ट (मंगळवार) रोजी विदर्भातील काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींची शक्यता आहे. विदर्भात वादळी वाऱ्यासह यलो अलर्ट राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी विदर्भाला मात्र पावसाचा तडाखा बसणार आहे. हवामान विभागाने बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी विजांच्या कडकडाटासह आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर मुसळधार पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून, या भागांसाठीही ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मात्र, याच जिल्ह्यातील सपाटीच्या भागांसह अहिल्यानगर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये केवळ हलका ते मध्यम पाऊस पडेल. कोकण आणि उत्तर महाराष्ट्राला दिलासा गेल्या आठवड्यात पावसाचा हाहाकार अनुभवणाऱ्या कोकणाला आता मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही हवामान इशारा नाही. इथे केवळ हलक्या सरी आणि ढगाळ वातावरण राहील. तसेच, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव येथेही कोरडे हवामान किंवा पावसाची हलकी उघडीप राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा कायम, शेतकरी चिंतेत मराठवाड्यात पावसाची तूट अद्यापही भरून निघालेली नाही. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. येथे पुढील काही दिवस पावसाचा जोर कमीच राहणार असून, हलका पाऊस आणि ढगाळ हवामान राहील. पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे मराठवाड्यासह राज्यातील इतर काही भागांतील शेतकऱ्यांची चिंता आता वाढू लागली आहे. हेही वाचा.. काश्मीरच्या कुपवाड्यात ढगफुटी: बिहारमध्ये वीज कोसळून 8 जणांचा मृत्यू, यूपीमधील 72 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट मध्य प्रदेशात आतापर्यंत सरासरी 15.4 इंच पाऊस झाला आहे. हा पाऊस कोट्याच्या निम्म्याहूनही कमी आहे. भोपाळ, ग्वाल्हेर, उज्जैन-जबलपूरसह 42 जिल्ह्यांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला आहे. IMD (हवामान केंद्र) नुसार, पुढील 2 दिवस म्हणजे मंगळवार आणि बुधवार रोजी कुठेही मुसळधार पावसाचा इशारा नाही. उत्तर प्रदेशात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. सोमवारी लखनऊ, कानपूर, वाराणसी, बरेली, आग्रा येथे पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाने (IMD) बुधवारी 72 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *