![]()
पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या क्षुल्लक वादातून तिन मित्रांनीच एका ३१ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना शहरातील बापट चौक परिसरात रविवारी (दि. २) उशिरा रात्री घडली आहे. या प्रकरणात शहर पोलिसांनी काही तासातच तिन्ही मारेकऱ्यांना अटक केली आहे. शरीफ बेग रशीद बेग (३१, रा. लालखडी, अमरावती) असे मृतक तरुणाचे नाव आहे. शेख रेहान शेख हारून (रा. सुफियान नगर), शेख नरेन शेख इरफान (रा. सबा नगर) आणि इरफान खान उर्फ गोलू जावेद खान (रा. अकबर नगर) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. शरीफ बेग व तिन्ही आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत. रात्री अकरा वाजताच्या सुमारास शरीफ यांच्या मोबाईलवरून त्याच्या कुटुंबीयांच्या मोबाईलवर एक फोन आला. फोनवरील अनोळखी व्यक्तीने शरीफवर बापट चौक परिसरात चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची आणि त्याला उपचारासाठी इर्विन रुग्णालयात नेले जात असल्याची माहिती दिली. शरीफवर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच, त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत शरीफचा भाऊ अहमद बेग रशीद बेग (वय २५) याने सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.
Source link
पैशांच्या देवाणघेवाणीवरून मित्राचा खून, तिघांना अटक:आरोपींना 6 ऑगस्टपर्यंत सुनावली पोलिस कोठडी