![]()
यंग इंडिया बिझनेस क्लबच्या पदग्रहण सोहळा पार पडला. व्यापार, उद्योजकांनी आपल्या व्यवसायासमवेत समाजातील समस्यांच्या निर्दालनासाठी व सृजनशील वातावरण निर्माण करण्यासाठी योगदान देऊन समाजाप्रती असणारे दायित्व पूर्ण करावे, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायधीश संजय मेहरे यांनी याप्रसंगी केले. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर व वायबीसीचे संचालक सिद्धार्थ रुहाटीया, विदर्भ चेंबरचे अध्यक्ष नीरव वोरा, क्लबचे चेअरमन रमाकांत खेतान, व्यवस्थापकीय संचालक अॅड. देवेंद्र अग्रवाल, मावळते अध्यक्ष नीलेश बियाणी, नूतन अध्यक्ष कपिल ठक्कर, मावळते सचिव श्रीराम पांडे, नूतन सचिव काजल राजवैद्य आदी उपस्थित होते. यावेळी क्लबची नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. नूतन कार्यकारिणीत अध्यक्ष कपिल ठक्कर, सचिव काजल राजवैद्य, कोषाध्यक्ष शैलेंद्र अग्रवाल, उपाध्यक्ष श्रीराम पांडे, सहसचिव रूपाली धोत्रे, वायबीसी डायमंड म्हणून माजी अध्यक्ष नीलेश बियाणी, सीमा रुहाटिया, अपूर्वा पडगिलवार, रिझवाना मुसानी, डॉ. सपना मित्तल, योगेश तिवारी, आशिष पवित्रकार, अॅड. वल्लभ नारे, विशाल कलंत्री आदींचा समावेश करण्यात आला. सूत्रसंचालन शालिनी रोम यांनी यांनी केले. आभार श्रीराम पांडे यांनी मानले.
Source link
उद्योजकांनी सामजिक समस्यांचाही पाठपुरावा करावा- न्या. संजय मेहरे:यंग इंडिया बिझनेस क्लबची कार्यकारिणी गठीत; अध्यक्षपदी ठक्कर