Headlines

सिंहगड रस्त्यावर तरुणाच्या खुनाचे आरोपी अटकेत:पूर्ववैमनस्यातून झालेल्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, दोन अल्पवयीन ताब्यात




सिंहगड रस्त्यावर पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा खून करून फरार झालेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणात त्यांच्यासोबत असलेल्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुजीत सोमनाथ धुतावळे (वय 19) आणि आशिष राजू सोनवणे (वय 19, दोघे रा. समर्थनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 1 ऑगस्ट रोजी रात्री लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक पाहून शुभम राजू घोडके (वय 22) आणि त्याचा मेहुणा विष्णू शिवाजी शिरसाठ (वय 22) हे रिक्षातून सिंहगड रस्ता परिसरातून जात होते. पानमळा परिसरात आरोपींनी शुभम घोडके याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शुभमचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या मेहुण्याने, विष्णू शिरसाठ याने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून सुरू होता. फरार झालेले आरोपी सिंहगड रस्ता आणि पद्मावती परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी उज्ज्वल मोकाशी, शिवानंद कायगुडे, महेश मंडलिक आणि संदीप शिर्के यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी धुतावळे, सोनवणे यांच्यासह दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी अटक केलेल्या आरोपींना पर्वती पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, शंकर नेवसे, विनोद चव्हाण, कुंदन शिंदे, आशिष यादव, शंकर कुंभार, विजय पवार आणि साधना ताम्हाणे यांनी ही कारवाई केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *