![]()
गुरुवार १३ ऑगस्टपासून सण-उत्सवाचा महिना श्रावण सुरू होत असून, श्रावण म्हटले की, हिरवळीने नटलेली सृष्टी. यातच देवाधीदेव महादेव यांच्या पूजेचा महिना. यानिमित्त चारही श्रावण सोमवारी शहरातील मोठ्या शिवालयांमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळते. या गर्दीवर निय
.
या नियोजन बैठकांमध्ये सोमवारी कोणता प्रसाद भाविकांना द्यायचा यापासून कशाप्रकारे दर्शन रांगांची व्यवस्था करायची. पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा ठेवायच्या. मंदिरात होणारी गर्दी बघता अस्वच्छता ही होणारच. त्यामुळे स्वच्छतेसाठी किती मनुष्यबळाची नियुक्ती करायची. निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था कशी ठेवायची, याबाबत सध्या मंदिर संस्थानांकडून निर्णय घेतले जात आहेत.
शहरात गडगडेश्वर, तपोवनेश्वर, कोंडेश्वर, पाताळेश्वर, भुतेश्वर तसेच अंबागेटच्या आत अनेक शिवालये आहेत. येथे श्रावण महिन्यात विशेषत:सोमवारी दर्शनासाठी विशेष गर्दी असते. काही भाविक सहस्त्र तर काही १०८ बिल्वपत्र अर्पण करतात. याच कालावधीत ज्यांचे व्रत पूर्ण झाले त्या भाविकांद्वारे महाप्रसादाचेही आयोजन शिवालयातील सभागृहांमध्ये केले जाते. त्यामुळे श्रावण महिन्यात मोठ्या शिवालयांचा परिसर हा गर्दीने गजबजलेला दिसून येतो. काही भाविक अगदी लहान कावड यांत्रांचे तर काही विशाल कावड यात्रांचे आयोजन करीत असतात. या कावड यात्रा शिस्तीत कराव्यात, भाविकाची पूजा अपूर्ण राहू नये, यासाठी आधी मंदिरांमध्ये सुचना देण्याबाबत सर्वच संस्थानांनी सूचना फलकांवर नमूद करून ठेवले आहे.
त्याचप्रमाणे ज्या भाविकांना महाप्रसाद अर्पण करायचा आहे, त्यांनाही याबाबत काही दिवस आधी सूचना द्यावी लागणार आहे. जेणेकरून महाप्रसादाला येणारे भाविक तसेच दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढून गोंधळ होणार नाही.
कावड यात्रांसाठी विशेष व्यवस्था शहरातील मोठ्या शिवालयांमध्ये श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी अगदी वाजत गाजत ढोल, ताशे, आतषबाजीच्या गजरात विविध देखाव्यांसह देखण्या कावड यात्रा येत असतात. या कावड यात्रां अगदी शिवालयांपर्यंत व्यवस्थित पोहोचाव्यात म्हणून विशेष मार्गाचे नियोजन करण्यात आले असून कावड यात्रेतील मोजक्या भाविकांना कावडीसह तसेच इतर भाविकांना मात्र दर्शन रांगेतून प्रवेश दिला जाणार आहे.