Headlines

Mumbai Mayor Ritu Tawade Scraps BMC Tender Amid Aditya Thackeray Row


मुंबई महानगरपालिकेतील कथित कोट्यवधींच्या खर्चावरून आणि जुहू चौपाटीच्या स्वच्छतेवरून शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महापौर बंगल्याच्या नूतनीकरणासाठी 5 कोटींचा खर्च दाखवणारे

.

तो खर्च राणीच्या बागेचा, महापौर बंगल्याचा नाही

पत्रकार परिषदेत बोलताना महापौर रितू तावडे यांनी आदित्य ठाकरेंचे सर्व आरोप फेटाळून लावले. त्या म्हणाल्या, “गेले काही दिवस फेक नॅरेटिव्ह पसरवला जातोय की मी महापौर बंगल्याच्या डागडुजीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. मुळात ज्या टेंडरची चर्चा होत आहे, ते 2 कोटी 89 लाखांचे टेंडर महापौर बंगल्याचे नसून, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणीची बाग) आणि झू परिसराचे आहे. टेंडरच्या कॉपीवर स्पष्टपणे झूच्या संचालकांची स्वाक्षरी आहे.”

“अनावधानाने अधिकाऱ्यांनी या टेंडरच्या शीर्षकात ‘हेरिटेज बंगलो’ (महापौर बंगला) असा उल्लेख केला आणि तिथूनच हा सगळा गोंधळ सुरू झाला. मी स्वतः आज अधिकाऱ्यांना झापले आहे आणि चुकीचा उल्लेख असल्यामुळे हे टेंडर त्वरित मागे घेण्याचे आदेश दिले आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली. “बंगल्यात सध्या एक साधा खिळा ठोकण्याचेही काम सुरू नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

आदित्य ठाकरेंना टोला- ’25 वर्षांचा अभ्यास कुठे गेला?’

आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्यावर पलटवार करताना रितू तावडे म्हणाल्या, “किशोरीताईंना तर झोपेतही महापौर खुर्चीच दिसते. पण मला आश्चर्य आदित्य ठाकरेंचे वाटते. त्यांच्या पक्षाने सलग 25 वर्षे मुंबई महापालिकेवर राज्य केले, तरीही महापालिकेचे टेंडर कसे निघते आणि त्याचे प्रस्ताव कसे असतात, याचा त्यांना थोडाही अभ्यास नसावा? किमान त्यांनी टेंडरची कॉपी नीट वाचून मगच टीका करायला हवी होती.” महायुतीच्या चांगल्या कामामुळे ठाकरे गटाची दुकाने बंद झाली असून, आता केवळ खोटी माहिती पसरवून मायलेज घेण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांनी सुरू केल्याची बोचरी टीका महापौरांनी केली.

गाड्यांच्या खरेदीबाबतही दिले स्पष्टीकरण

नवीन गाड्यांच्या खरेदीच्या प्रस्तावावर बोलताना महापौरांनी सांगितले की, “हा प्रस्ताव अद्याप स्थायी समितीच्या मंजुरीसाठीही आलेला नाही. जे काम अद्याप झालेलेच नाही, त्यावर ठाकरे गट बोंबाबोंब करत आहे. शिवाय, त्या कंत्राटी पद्धतीच्या गाड्या आहेत, त्यामुळे नवीन गाड्या खरेदी करण्याचा प्रश्नच येत नाही.”

तसेच, राणीच्या बागेतील ज्येष्ठ नागरिकांच्या मॉर्निंग वॉकला लावण्यात आलेल्या निर्बंधांबाबत बोलताना, प्राण्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सेंट्रल झू ऑथॉरिटीकडून तशा सूचना आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी बॅरिकेड्स पुढे घेऊन त्यांच्यासाठी वॉकचा मार्ग मोकळा ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा..

महापौर बंगल्याचा ताजमहाल करायचा आहे का?: मुंबई महापौरांवर आदित्य ठाकरेंची टीका, सिद्धिविनायक प्रकरणावरही साधला निशाणा

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर बंगल्यावरील खर्चावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली. महापौर बंगल्याच्या दुरुस्ती आणि वाहन खरेदीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी “महापौर बंगल्याचा ताजमहाल करायचा आहे का?” असा सवाल उपस्थित केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.