![]()
हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीच्या फेज-३ परिसरात गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी संयुक्त मॉक ड्रिलचे आयोजन केले. संभाव्य दहशतवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांचा समन्वय आणि प्रतिसाद अधिक प्रभावी करण्यासाठी हा सराव करण्यात आला. या सरावात एनएसजी, मुंबईच्या २६ स्पेशल कॉम्पोझिट ग्रुपचे अधिकारी व कमांडो सहभागी झाले होते. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने कमांडोंनी परिसरात प्रवेश करून दहशतवाद्यांविरोधातील कारवाईचे प्रात्यक्षिक सादर केले. विशेष म्हणजे, एनएसजीसोबत प्रशिक्षणासाठी भारतात आलेल्या अमेरिकन सैन्य दलातील अधिकारी आणि कमांडोंनीही या मॉक ड्रिलमध्ये सहभाग घेतला. या संयुक्त सरावात फोर्स वन, पुणे, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवादविरोधी शाखा (एटीबी), जलद प्रतिसाद पथक (क्यूआरटी), बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), श्वान पथक, स्थानिक पोलीस आणि हिंजवडी वाहतूक विभागाचे अधिकारी सहभागी झाले. याशिवाय पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग, एमआयडीसी अग्निशमन दल, इन्फोसिस कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनीही यात सहभाग नोंदवला. मॉक ड्रिलदरम्यान अचानक दहशतवादी हल्ला झाल्यास नागरिकांनी व सुरक्षा यंत्रणांनी कोणती कार्यपद्धती अवलंबावी, जखमींना सुरक्षित बाहेर कसे काढावे, इमारतीतील नागरिकांचे स्थलांतर, बॉम्ब शोध व निकामीकरण, तसेच दहशतवादविरोधी कारवाईची प्रत्यक्ष रंगीत तालीम करण्यात आली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विविध सुरक्षा यंत्रणांमध्ये समन्वय वाढविणे, आपत्कालीन परिस्थितीत निर्णयक्षमता आणि प्रतिसादाची गती तपासणे हा होता. अशा प्रकारच्या संयुक्त सरावामुळे प्रत्यक्ष संकटाच्या वेळी जीवित व वित्तहानी कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. हेही वाचा.. बेईमानी करणाऱ्यांना कायद्यानेच संपवू:संजय राऊतांचा शिंदेंना इशारा, भाजप किंवा प्रहारमध्ये विलीन होण्याशिवाय त्यांना पर्याय नसल्याचा दावा शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या सुनावणीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. “ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात अतिशय धारदार युक्तिवाद केल्याने शिंदे गटात चलबिचल सुरू झाली आहे. आता त्यांच्यासमोर स्वतःचा गट भाजपमध्ये किंवा प्रहारसारख्या छोट्या पक्षात विलीन करण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही,” असे सूचक विधान राऊत यांनी केले आहे. याचवेळी त्यांनी झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनावरून राहुल गांधींवर टीका करणाऱ्या भाजपलाही उत्तर दिले आहे. सविस्तर वाचा..
Source link
पुण्यात दहशतवादी हल्ल्याचे संयुक्त मॉक ड्रिल:आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणांची तयारी तपासली, अमेरिकन सैन्यही सहभागी