![]()
शहरात आयोजित आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी (दि.४) विविध वयोगटांतील सामने अत्यंत चुरशीचे आणि रंगतदार वातावरणात पार पडले. अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या सामन्यांमध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल, आर्मी पब्लिक स्कूल, श्री साई इंग्लि
.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात आर्मी पब्लिक स्कूल आणि आर्मी एमआयसी अँड एस यांच्यात झालेल्या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलने एकतर्फी वर्चस्व राखले. आकाश चौहान याने दुसऱ्या हाफमध्ये ४० व ४७ व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल केला. अजय सांगळे याने ४३ व्या मिनिटाला एक गोल करत संघाच्या आघाडीत भर घातली. तर रुद्र कांबळे याने ४५ व ६० व्या मिनिटाला दोन गोल झळकावत संघाचा विजय निश्चित केला. आर्मी पब्लिक स्कूलने ५-० अशा मोठ्या फरकाने विजय मिळवत प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करू दिला नाही. दुपारच्या सत्रात १६ वर्षांखालील मुलांच्या गटात आर्मी पब्लिक स्कूल आणि आर्मी एमआयसी अँड एस यांच्यात पुन्हा एकदा रोमांचक सामना रंगला. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी अनेक आक्रमणे केली, मात्र गोल करण्यात अपयश आले. अखेर प्रतिक शेळके याने ३१ व्या मिनिटाला निर्णायक गोल करत आर्मी पब्लिक स्कूलला आघाडी मिळवून दिली. हा गोल अखेरपर्यंत कायम राखत आर्मी पब्लिक स्कूलने १-० अशा फरकाने विजय मिळवला. या स्पर्धेला राज्यातील खेळाडूंचा प्रतिसाद मिळाला.
साई इंग्लिश स्कूलने मिळवला एकहाती विजय १४ वर्षांखालील मुलांच्या गटात श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल आणि कर्नल परब स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलने आक्रमक खेळ करत ४-० अशा फरकाने एकहाती विजय मिळवला. साईदीप भगत याने ४ व्या मिनिटाला पहिला गोल करून संघाचे खाते उघडले आणि २४ व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला. अर्श शेख याने २१ व्या मिनिटाला तर आर्या शिंदे याने ३८ व्या मिनिटाला गोल करत विजय अधिक दिमाखदार केला. कर्नल परब स्कूलला मात्र एकही गोल करता आला नाही.