Headlines

विदर्भ साहित्य संघाच्या अमरावती शाखेची नवीन कार्यकारिणी:डॉ. श्यामसुंदर निकम अध्यक्षपदी, इतर पदाधिकाऱ्यांची निवड




विदर्भ साहित्य संघाच्या अमरावती शाखेची नूतन कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. तपोवनातील संत अच्युत महाराज खुले सभागृहात पार पडलेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. निवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक आणि लेखक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. वि.सा. संघाचे केंद्रीय शाखा समन्वयक विवेक कवठेकर यांच्या उपस्थितीत ही कार्यकारिणी निवडण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. श्यामसुंदर निकम यांनी मावळते अध्यक्ष पत्रकार विलास मराठे यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. डॉ. निकम आगामी २०२३ ते २०३१ या कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतील. यावेळी साहित्यिकांनी साहित्यातून मानवसेवेचे विविध उपक्रम राबवावेत आणि समाजाला दिशा देणारे वास्तववादी लेखन करावे, असा सूर उमटला. नूतन कार्यकारिणीतील इतर पदाधिकाऱ्यांमध्ये कार्याध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी डॉ. कुमार बोबडे, इंजिनीअर दीपक दारव्हेकर आणि राजेश बहाळे यांची नियुक्ती करण्यात आली. सचिवपदी आबासाहेब कडू, सहसचिवपदी विशाल मोहोड आणि खजिनदारपदी डॉ. पंकज वानखडे यांची निवड झाली. याशिवाय, कार्यक्रम समिती प्रमुख म्हणून माधव पांडे, प्रसिद्धी प्रमुख म्हणून विशाल कन्हेरकर व संदीप देशमुख आणि समन्वयक म्हणून खुशाल गुल्हाने, गजानन काकडे व पद्माकर मंडवधरे यांचा समावेश आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲड. डॉ. सुरेश चापोरकर, डॉ. राजेंद्र राऊत, नितीन भट, शिवचरण प्रधान, शीतल राऊत व डॉ. दिनेश राऊत यांची निवड करण्यात आली. मार्गदर्शनासाठी डॉ. बबन बेलसरे, प्राचार्य डॉ. दिलीपसिंह खांबरे व प्रा. इंदिराताई ठाकरे यांचे सल्लागार मंडळ गठित करण्यात आले आहे. या बैठकीला अ.भा. साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष ज्येष्ठ लेखिका डॉ. प्रभा गणोरकर, प्रा. वसंत आबाजी डहाके, सुदर्शनजी गांग (जैन), वि.सा. संघाच्या केंद्रीय पदाधिकारी डॉ. शोभा रोकडे, प्रा. रेखा बेलसरे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. प्राजक्ता राऊत यांनी केले, तर विशाल मोहोड यांनी उपस्थितांचे आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *