Headlines

भाजपने राम मंदिर लुटीचे नवे रामायण लिहिले:ऑस्करच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघात




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी ‘रामायण’ चित्रपटाबाबत केलेल्या एका विधानावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. “रामायण चित्रपटाला ऑस्कर न मिळाल्यास मी ज्युरींवर निराश होईन,” असे विधान फडणवीस यांनी केले होते. त्यांच्या याच विधानावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे. “ऑस्कर मिळवण्यासाठी ज्युरींच्या घरी थेट ईडी आणि सीबीआय पाठवा,” असा सल्ला राऊतांनी ट्वीट करत दिला आहे. ‘राम मंदिरातील चोरीवर आधी बोला’ संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट लक्ष्य केले. अयोध्येतील राम मंदिरातील कथित गैरप्रकारांवरून भाजपवर टीका करताना राऊत म्हणाले, “श्री देवेंद्रजी, आधी राम मंदिरातील दानपेटी चोरीवर बोला. अयोध्येत राम मंदिर लुटीवरचे नवे रामायण भाजपाने लिहिले आहे!” ‘ज्युरींचा गट फोडण्यासाठी अमित शाहांना पाठवा’ ऑस्करच्या मुद्द्याला महाराष्ट्रातील पक्षफुटीच्या राजकारणाशी जोडत राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये पुढे लिहिले आहे, “विषय राहिला ऑस्करचा, तर ज्युरी मंडळींच्या घरी लगेच ED आणि सीबीआय पाठवा साहेब, काम सोपे आहे. किंवा ज्युरींचा गट फोडण्यासाठी अमित शहा यांना पाठवा. चिंता नाही करायची!” हेही वाचा.. बंगळुरूत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 11वे अधिवेशन:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे आश्वासन- जातीय जनगणनेत ओबीसी कॉलमचा समावेश करणार राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या 11व्या राष्ट्रीय अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला एक मोठे आणि महत्त्वपूर्ण आश्वासन दिले आहे. आगामी जातीय जनगणनेमध्ये ‘ओबीसी’ समाजासाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. या अधिवेशनाला फडणवीस प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांनी एका विशेष व्हिडीओ संदेशाद्वारे अधिवेशनाला आणि ओबीसी बांधवांना संबोधित केले. सविस्तर वाचा निवडणुका जिंकण्याची भाजपची पद्धत ‘फ्रॉड’:राज ठाकरेंचा आरोप, मोहन भागवतांच्या विद्यार्थी संवादावर म्हणाले- उशीर झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर असून, आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी राज्याची सद्यस्थिती, नाशिकमधील खड्डे, ‘नीट’ परीक्षेतील घोळ आणि जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राज्य व केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “सगळी शहरे बर्बाद होत आहेत, तरीही तुम्ही भाजपच्या लोकांना निवडून देत असाल तर भोगा,” अशा शब्दांत त्यांनी नाशिककरांना आणि जनतेला खडेबोल सुनावले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *