संजय राऊत हे औरंगजेब फॅन क्लबसोबत नाश्ता करतात, अफजल खानाच्या दाढ्या कुरवळतात अन् राहुल गांधी तसेच एमआयएमच्या नेत्यांसोबत बसतात. हे सर्व चालेल; पण देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आलेल्या खासदारांवर बोलण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिका
.
नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत महाराष्ट्रातील खासदारांनी देशाच्या आणि राज्याच्या विकासावर चर्चा केली आहे. मात्र, उद्धव ठाकरे हे केवळ आपल्या मुलाचे राजकीय भवितव्य कसे सेट करता येईल, यातच व्यस्त असल्याची टीका नवनाथ बन यांनी केली.
राऊतांना काँग्रेस हित महत्त्वाचे
नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊतांना देशहिताशी काहीही देणेघेणे नसून केवळ काँग्रेसचे हित महत्त्वाचे वाटत आहे. ठाकरे गटाचे खासदार जेव्हा ‘मातोश्री’वर जायचे, तेव्हा त्यांना दोन-दोन, तीन-तीन तास ताटकळत राहावे लागायचे. मातोश्रीची दारे बंद होती. त्यातच संजय राऊत यांनी खासदारांना सातत्याने शिव्या दिल्या, त्यांना ठेचण्याची भाषा केली. राऊतांच्या याच वागण्याला व शिव्यांना कंटाळून खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि लोकशाही मार्गाने एकनाथ शिंदे यांच्या मूळ शिवसेनेचे नेतृत्व स्वीकारले, असा दावा त्यांनी केला.
राऊतांनी पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे
नवनाथ बन म्हणाले की, लोकसभेत 240 खासदारांचा आकडा 300 वर कसा गेला, असा सवाल विचारणाऱ्या राऊतांनी आधी स्वतःचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. ज्या खासदारांना राऊतांनी शिव्या दिल्या, त्यांनीच पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला आणि हा आकडा 300 वर पोहोचला. स्वतःचे आमदार-खासदार सांभाळता येत नाहीत अन् दुसन्यांना दोष देतात, असा टोला लगावत नवनाथ बन यांनी ठाकरे गटातील फुटीला संजय राऊत यांचे वक्तव्यच जबाबदार असल्याचे स्पष्ट केले.
हे ही वृत्त वाचा
भाजपने राम मंदिर लुटीचे नवे रामायण लिहिले:ऑस्करच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी ‘रामायण’ चित्रपटाबाबत केलेल्या एका विधानावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. “रामायण चित्रपटाला ऑस्कर न मिळाल्यास मी ज्युरींवर निराश होईन,” असे विधान फडणवीस यांनी केले होते. त्यांच्या याच विधानावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे. “ऑस्कर मिळवण्यासाठी ज्युरींच्या घरी थेट ईडी आणि सीबीआय पाठवा,” असा सल्ला राऊतांनी ट्वीट करत दिला आहे. वाचा सविस्तर