Headlines

मुंबईत 8 आणि 9 ऑक्टोबरला सायरनचा आवाज घुमणार:फोर्ट-क्रॉस मैदान परिसरात प्रोटोटाइपची चाचणी, BMCचे ‘घाबरू नका’ आवाहन




मुंबई शहरातील नागरिकांना 8 आणि 9 ऑक्टोबर 2026 रोजी सायरनचा आवाज ऐकू येण्याची शक्यता आहे. फोर्ट परिसरातील जुने सचिवालय, जोड इमारत तसेच क्रॉस मैदानाजवळील नागरी संरक्षण महाविद्यालयाच्या इमारतीवर बसविण्यात आलेल्या प्रोटोटाइप सायरन उपकरणांची पूर्वनियोजित चाचणी या दोन दिवसांत घेण्यात येणार आहे. या चाचणीदरम्यान सायरन वाजविण्यात येणार असल्याने नागरिकांनी त्याचा आवाज ऐकून घाबरून जाऊ नये, तसेच कोणताही गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरी संरक्षणाच्या दृष्टीने सायरनची चाचणी माननीय महासंचालक (नागरी संरक्षण, नवी दिल्ली) यांच्या मार्गदर्शनाखाली सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (C-DOT) यांच्या पथकाने हे प्रोटोटाइप सायरन उपकरण विकसित केले आहे. या उपकरणांची प्रत्यक्ष ठिकाणी कार्यक्षमता तपासण्यासाठी मुंबईतील निवडक ठिकाणी त्यांची उभारणी करण्यात आली आहे. मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड इमारत, फोर्ट तसेच नागरी संरक्षण महाविद्यालय, क्रॉस मैदान येथील इमारतींवर हे सायरन बसविण्यात आले आहेत. या उपकरणांच्या कार्यप्रणालीची आणि आवाजाच्या प्रसारणाची चाचणी घेण्यासाठी 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी सायरन वाजविण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थिती नसल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण सायरनचा आवाज ऐकून नागरिकांमध्ये भीती किंवा संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने स्पष्ट केले आहे की ही चाचणी पूर्णपणे पूर्वनियोजित आहे. मुंबईत कोणतीही प्रत्यक्ष आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली नाही किंवा कोणताही धोका निर्माण झालेला नाही. त्यामुळे चाचणीदरम्यान सायरनचा आवाज ऐकू आल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच सायरनच्या आवाजाशी संबंधित कोणतीही अप्रमाणित माहिती सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून प्रसारित होत असल्यास त्यावर विश्वास ठेवू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सायरनचा आवाज ऐकल्यानंतर नागरिकांनी सोशल मीडिया, मेसेजिंग अॅप किंवा इतर माध्यमांवरून मिळणाऱ्या अनधिकृत माहितीकडे दुर्लक्ष करावे. प्रशासनाकडून अधिकृतरीत्या देण्यात आलेल्या माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ही चाचणी नागरी संरक्षण व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची असून, सायरन उपकरणांची कार्यक्षमता तपासणे आणि भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीत त्यांचा प्रभावी वापर करता येतो का, हे पडताळणे हा या चाचणीमागील उद्देश आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी फोर्ट आणि क्रॉस मैदान परिसरात सायरनचा आवाज ऐकू आल्यास नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये. ही नियमित आणि पूर्वनियोजित तांत्रिक चाचणी असल्याने नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा अनधिकृत माहितीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. हेही वाचा… ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यास 2 महिन्यांहून अधिक विलंब:बिलोली तहसील कार्यालयातील 2 महसूल कर्मचारी निलंबित, जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंची कठोर कारवाई आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रमाणपत्रासाठी दाखल केलेल्या अर्जावर विहित मुदतीत कार्यवाही न केल्याप्रकरणी बिलोली तहसील कार्यालयातील दोन महसूल कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कठोर कारवाई केली आहे. महसूल सहाय्यक सी.पी. धर्मेकर आणि सहाय्यक महसूल अधिकारी एन.व्ही. पाळेकर यांना निलंबित करण्यात आले आहे. नागरिकांना शासकीय सेवा देताना दिरंगाई अथवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून प्रशासनाने दिला आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *