Headlines

Dr. B.R. Ambedkar International Award 2026 London; Global Leaders Honored


सामाजिक न्याय, शिक्षण, आर्थिक समावेशन, मानवाधिकार आणि सामुदायिक सेवेसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा लंडनमध्ये गौरव करण्यात आला. किंग्स कॉलेज येथील ग्रीनवुड थिएटरमध्ये ‘विश्वनेता डॉ. बी. आर. आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड

.

या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन विश्व लीडर टेकमीडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई यांच्या वतीने शिरीष रामटेके यांनी केले. तीन दिवसीय या कार्यक्रमात विविध देशांतील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, राजनयिक, न्यायविद, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच सामाजिक संस्थांशी संबंधित मान्यवरांनी सहभाग घेतला.

पाच प्रमुख श्रेणींमध्ये पुरस्कारांचे वितरण

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात सामाजिक परिवर्तन, शिक्षण, मानवाधिकार, आर्थिक समावेशन आणि सामुदायिक सेवा अशा विविध क्षेत्रांतील योगदानाची दखल घेण्यात आली. पुरस्कार पाच प्रमुख श्रेणींमध्ये प्रदान करण्यात आले. भारतातील जी. गोविंदराजू, डॉ. पल्लवी जी. के., मोहम्मद सुहैल याकूब खांडवानी, वर्षा विद्या विलास, सद्गुरू योगीराज डॉ. मंगेशदा आणि शिवशंकर लातुरे यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

भारताबाहेरील उल्लेखनीय योगदानाचीही या सोहळ्यात दखल घेण्यात आली. अमेरिकेतील आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका आणि प्रो. केविन डी. ब्राउन, कॅनडातील पोएटिक जस्टिस फाउंडेशन, तसेच जपानमधील इचिरो कोइके यांना त्यांच्या संबंधित क्षेत्रातील कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.

मान्यवरांचाही विशेष सन्मान

या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. महामहिम त्सेरिंग यांगकी, पद्मश्री कल्पना सरोज, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि श्री. गौतम सी. यांच्यासह इतर मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे भारतातील सामाजिक न्याय आणि समतेच्या विचारांना जागतिक व्यासपीठ मिळाले. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या सामाजिक समानता, शिक्षण, स्वाभिमान, मानवाधिकार आणि सशक्तीकरणाच्या विचारांना विविध देशांतील प्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.

आंबेडकर विचारांचा जागतिक प्रसार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार केवळ भारतापुरते मर्यादित नसून सामाजिक न्याय, समानता आणि मानवाधिकारांच्या जागतिक चळवळींसाठीही प्रेरणादायी ठरत आहेत. याच विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या कार्याची दखल घेणे आणि त्यांना पुढील कामासाठी प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमादरम्यान विविध विषयांवर चर्चा, संवाद आणि विचारविनिमयही करण्यात आला. भारतासह विविध देशांतील प्रतिनिधी एकत्र आल्याने सामाजिक न्याय आणि समतेच्या मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर संवाद साधण्याची संधी मिळाली.

‘विश्वनेता डॉ. बी. आर. आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड्स 2026’ च्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यासोबतच त्यांच्या कार्याची व्याप्ती जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा संदेश देण्यात आला. सामाजिक न्याय, समानता, शिक्षण आणि सशक्तीकरणासाठी कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील व्यक्ती व संस्थांचा सन्मान हा भविष्यातील सामाजिक परिवर्तनाला अधिक बळ देणारा ठरेल, असा सूर या सोहळ्यात व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा…

महाज्योतीच्या परीक्षा गोंधळावर अतुल सावे यांचा खुलासा:‘तांत्रिक दोष आढळल्यास परीक्षा केंद्र ब्लॅकलिस्ट करू’

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीच्या परीक्षेदरम्यान आंबेगाव येथील एका परीक्षा केंद्रावर तांत्रिक अडचणीमुळे सुमारे 40 विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. या प्रकारावर मंत्री अतुल सावे यांनी स्पष्टीकरण देत, संबंधित विद्यार्थ्यांची परीक्षा तातडीने दुसऱ्या दिवशी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच तपासात संबंधित परीक्षा केंद्राचा निष्काळजीपणा किंवा दोष आढळल्यास ते केंद्र ब्लॅकलिस्ट करण्याचा इशाराही त्यांनी दिला. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.