![]()
येथील शेतकरी केशव रामनाथ सोनवणे व सुरेश रामनाथ सोनवणे यांनी आपल्या मातोश्री भागीरथीबाई रामनाथ सोनवणे यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त मनेगाव नूतन जवाहर विद्यालयास २५,००० तसेच शितलताई रमण शिंदे यांनीही मातोश्री सोनवणे यांच्या स्मरणार्थ विद्यालयास २५,००० रुपयांची देणगी देऊन शिक्षणसेवेस हातभार लावला. अशा प्रकारे शेतकरी सोनवणे कुटुंबाकडून विद्यालयाच्या विकासासाठी एकूण ५०,००० रुपयांची देणगी देण्यात आली. शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून, समाजाचा आधारवडही असल्याची प्रचिती या उपक्रमातून आली. संस्थेचे संचालक कृष्णाजी भगत, शालेय समितीचे अध्यक्ष नितीन शिंदे, मुख्याध्यापिका आहेर एस. के., शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक गायकवाड, पर्यवेक्षक आर. बी. गांगुर्डे, शिक्षक प्रतिनिधी एस. सी. खैरनार आदींनी सोनवणे व शिंदे परिवाराचे विद्यालयाच्या वतीने आभार मानले.
Source link
शिक्षणसेवेस हातभार:विद्यालयासाठी शेतकरी कुटुंबाकडून 50 हजार