Headlines

मनमाड:मनमाडचे नगरसेवक शेख मजीद इब्राहिम सहा वर्षांसाठी अपात्र




नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ८-ब मधून नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव जागेवर निवडून आलेले शेख मजीद इब्राहिम यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाद्वारे ६ वर्षांसाठी अपात्र घोषित केले आहे. पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान शेख मजीद इब्राहिम यांनी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर केले होते. मात्र, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने प्रमाणपत्र अवैध ठरविल्याचे आदेशात नमूद आहे. निर्धारित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचा मुद्दाही आदेशात नमूद केला आहे. या सर्व बाबींचा विचार करून नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १६ चे पोटकलम १-ब (अ) अन्वये शेख मजीद इब्राहिम यांना ६ वर्षांसाठी अपात्र घोषित केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *